​चांगल्या आरोग्यासाठी ‘चलती-फिरती’ मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2016 01:48 PM2016-07-03T13:48:14+5:302016-07-03T19:18:14+5:30

खुर्च्यांवर बसून मीटिंग न घेता कॉरिडोर वा आॅफिस परिसरात चालत-बोलत केलेली मीटिंग म्हणजे ‘वॉकिंग मीटिंग’.

'Moving round' meeting for better health | ​चांगल्या आरोग्यासाठी ‘चलती-फिरती’ मीटिंग

​चांगल्या आरोग्यासाठी ‘चलती-फिरती’ मीटिंग

Next
फिसमध्ये टेबल वर्क म्हणजेच बैठे काम करणार्‍याची संख्या खूप जास्त आहे. दिवसातील अधिकाधिक काळ एकाच जागी बसल्यामुळे आरोग्याविषयक अनेक समस्या उद्भवताना दिसतात. याला पर्याय म्हणून सध्या ‘वॉकिंग मीटिंग’चा पर्याय चांगलाच प्रचलित होत आहे.

आॅफिसमधील कॉनफरन्स रुममध्ये खुर्च्यांवर बसून मीटिंग न घेता कॉरिडोर वा आॅफिस परिसरात चालत-बोलत केलेली मीटिंग म्हणजे ‘वॉकिंग मीटिंग’. यामुळे कर्मचाºयांना बैठे कामापासून ब्रेकही मिळतो आणि शरीराची हालचाला झाल्यामुळे आरोग्यालादेखील लाभ मिळतो.

आठवड्यातून केवळ एक मीटिंग जरी याप्रकारे केली तर कर्मचार्‍याच्या आॅफिसातील शारीरिक हालचालीमध्ये दहा मिनिटांची वाढ होते. मियामी विद्यापीठातील सहप्राध्यापक आॅल्बर्टो केबन-मार्टिनेझ यांनी सांगितले की, वॉकिंग मीटिंग प्रोटोकॉलमुळे शारीरिक हालचालीचे प्रमाणा वाढते. बैठे काम केल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत मिळते.

‘अमेरिके न हार्ट असोसिएशन’ने दिलेल्या सल्ल्यानुसार दररोज ३० मिनिटे अर्थात १५० प्रतिआठवडा फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी होणे आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. आॅफिसमध्ये अशा प्रकारची शारीरिक हालचाल होण्याची फारशी संधी नसते. वॉकिंग मीटिंगचा सकारात्मक पर्याय आहे.

काही संशोधनांतून असेदेखील दिसून आले आहे की, रोजच्यारोज किमान १५ मिनिटे जरी जलद चालण्यासारखा व्यायाम केला तर जीवनमानात तीन वर्षांची वृद्धी होते.

Web Title: 'Moving round' meeting for better health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.