मुळ्याचा फेसपॅक उन्हाळ्यात चेहऱ्याला देतो नवीन चमक!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:13 PM2019-04-17T12:13:12+5:302019-04-17T12:17:36+5:30
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. पण नैसर्गिक उपायांना यातून मात्र दूर ठेवतात.
(Image Credit : Reward Me)
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात. पण नैसर्गिक उपायांना यातून मात्र दूर ठेवतात. त्यांचा विश्वास जास्त बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सवर असतो. खरंतर नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक पद्धतीने त्वचेची काळजी अधिक सोप्या प्रकारे आणि चांगली घेता येते. जर तुम्हालाही गरमीमध्ये त्वचा तजेलदार आणि टवटवीत ठेवायची असेल तर एक उपाय आम्ही सांगणार आहोत. मुळ्याचा फेसपॅक उन्हाळ्यात त्वचेची चांगली काळजी घेतो. त्वचेच्या सुरक्षेसाठी मुळ्याचा फेसपॅक कसा तयार करायचा हे खालीलप्रमाणे सांगता येईल.
कसा कराल तयार?
१) मुळ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुळ्याचा तुकडा आधी किसून बारीक करा. नंतर त्याची पेस्ट तयार करा. गरमी जास्त असेल तर तुम्ही ही पेस्त ठंड सुद्धा करु शकता.
२) या पेस्टमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका आणि हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. तसेच यात ४ ते ५ थेंब ऑलिव ऑइलचे टाका. तुमचा मुळ्याचा फेसपॅक तयार आहे. गरमीच्या दिवसात चेहऱ्याला थंड वाटावं यासाठी हा फेसपॅक तुम्ही थंडही करु शकता.
३) हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यावर काही वेळ तसाच ठेवा. फेसपॅक सुकल्यावर पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा.
४) चेहऱ्यावर हा फेसपॅक लावण्याआधी मनगटावर थोडी पेस्ट लावून टेस्ट करा. जर त्वचेला हा फेसपॅक सूट होत असेल तरच चेहऱ्यावर लावा. जर त्वचेला सूट करत नसेल तर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू नका.
या फेसपॅकचे फायदे
जर तुम्ही मुळ्याच्या फेसपॅकचा वापर करत असाल तर याने तुमच्या आरोग्यासोबतच चेहऱ्यालाही फायदा होईल. मुळ्याचा फेसपॅक हा तेलकट त्वचेसाठी अधिक फायदेशीर मानला जातो.
या फेसपॅकने त्वचा चमकदार होते. याने चेहऱ्याचं ब्लीचही होतं. पण जर तुमची त्वचा फार संवेदनशील असेल तर याचा वापर केल्यावर हलकी जळजळ होऊ शकते.
कुणी करु नये वापर?
मुळ्याच्या फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याआधी स्कीन टेस्ट नक्की करा. जर त्वचेवर कशाप्रकारचे लाल डाग किंवा जळजळ होत असेल तर या फेसपॅकचा वापर करु नये. कारण काही लोकांना याची अॅलर्जी असू शकते. अशात याने नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कधीही मुळ्याच्या फेसपॅकचा वापर करायचा असेल तर आधी टेस्ट करावी. जर त्वचा अधिक रखरखीत असेल तर या फेसपॅकचा वापर करु नका.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. )