नखं पिवळी पडतायत का? अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 03:52 PM2018-11-12T15:52:43+5:302018-11-12T15:57:37+5:30

सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा आणि त्वचा नाही तर आपली नखं ही आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. त्यामुळे नखांचीही तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं असतं.

nail care yellow nails scurbing nails | नखं पिवळी पडतायत का? अशी घ्या काळजी!

नखं पिवळी पडतायत का? अशी घ्या काळजी!

Next

सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा आणि त्वचा नाही तर आपली नखं ही आपल्या सौंदर्यात भर घालत असतात. त्यामुळे नखांचीही तितकीच काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अनेकदा आपण नखांना नेलपेन्ट लावतो पण आपण त्यांची काळजी घेणं मात्र विसरून जातो. परंतु नखांची योग्य ती काळजी घेतली नाही तर नखं तुटतात किंवा पिवळी पडतात. त्यामुळे नखांची योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. 

अशी घ्या नखांची काळजी

स्क्रबिंग करा :

नखांचं सौंदर्य टिकवण्यासाठी मेनिक्योरने सुरुवात करा. स्क्रब घेऊन ते हातांवर व्यवस्थित स्क्रबिंग करा. जोपर्यंत हातांवर पूर्णपणे डेड सेल्स आणि घाण स्वच्छ होत नाही तोपर्यंत व्यवस्थित स्क्रब करा. मेटलचे स्वस्त फायलर यूज करण्याऐवजी चांगल्या क्वॉलिटीचा फायलर वापरा. नखांच्या आजूबाजूची त्वचा क्यूटिकल क्लिपर्सचा वापर करून काढा. 

नेल पेन्ट लावा :

नखांना परफेक्ट शेपमध्ये फाइल करण्यासाठी बेस कोट कलर्सची नेलपेंट लावा. या बेसची फक्त एकच लेयर लावा. जर तुम्हाला नेलपेंट व्यवस्थित लावणं शक्य होत नसेल तर आजूबाजूच्या स्किनवर पेट्रोलियम जेली लावा. त्यामुळे नेलपॉलिश त्वचेवर लागणार नाही. 

फिनिशिंग टच :

नेलपेंट नखांच्या खालील भागांवर लावू नका. फिनिशिंग टच देण्यासाठी नखांवर ट्रान्सपरन्ट नेलपेंट लावा. यामुळे मेनिक्योर बराच काळ टिकण्यासाठी मदत होईल आणि नखांवर ग्लो येईल. 

एक्सपर्ट सल्ला :

कडक उन्हामुळेही नखं पिवळी पडतात. यापासून वाचण्यासाठी सनस्क्रिनचा वापर करू शकता. नेलपेंट लावण्यासाठी बेसकोट अप्लाय करा. यामुळे नखांचा उन्हापासून बचाव होतो आणि ती पिवळी पडत नाही. 

साबणाच्या पावडरचा वापर केल्याने नखांवर मसाज क्रिम दररोज अप्लाय करा. क्रिम लावल्यानंतर कापसाने हळूहळू पुसून टाका. रात्री झोपण्यापूर्वी चांगल्या तेलाने हातांना मसाज करा.
 
घरगुती उपायांचा वापर करा :

नखं चमकदार बनवण्यासाठी एक टिस्पून जेलेटिन गरम पाण्यामध्ये टाका. पाणी थंड झाल्यानंतर त्यामध्ये सिट्रिक ज्यूस टाका. या मिश्रणाने नखं स्वच्छ करा. 

पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करा आणि 15 मिनिटांपर्यंत त्यामध्ये हात बुडवून ठेवा. त्यानंतर कापसाच्या मदतीने पुसून टाका. नखांना पिवळं होण्यापासून वाचवण्यासाठी पाण्यामध्ये लिंबाचा रस एकत्र करा आणि 10 मिनिटांपर्यंत आपले हात त्यामध्ये बुडवून ठेवा. त्यामुळे पिवळेपणा दूर होईल. 

फाइन टिप्स :

- नेलपेंट लावत असाल तर तिचा जास्त वापर कमी करा. त्यामध्ये असलेली केमिकल्स नखं पिवळी पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

- आहारामध्ये प्रोटीनयुक्त डाएटचा समावेश करा. कारण नखं प्रोटीन्सपासून तयार झालेली असतात. 

- नखं खाण्याची सवय असेल तर असं करणं लगेच थांबवा. 

- जर तुमच्या नखांच्या आजूबाजूची त्वचा निघत असले तर त्यावर क्युटिकल ऑइल किंवा क्रिम लावा. 

- हेल्दी नखं आणि त्यांचा ड्रायनेस कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाच्या तेलाने मसाज करा. 

Web Title: nail care yellow nails scurbing nails

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.