नेलपेन्ट काढण्यासाठी नेलपेन्ट रिमुव्हर संपलंय? 'हे' उपाय करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:10 PM2018-08-24T12:10:53+5:302018-08-24T12:15:57+5:30
आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. तर सध्या अनेक महिला नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेलपेन्टस् वापरतात.
आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. त्यासाठी अनेकदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेण्यात येतो. तर सध्या अनेक महिला नखांचं सौंदर्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या नेलपेन्टस् वापरतात. एकदा लावलेली नेलपेन्ट काढण्यासाठी नेल रिमुव्हरचा वापर करण्यात येतो. पण कधी नेल रिमुव्हर संपलं असेल तर मॅचिंग नेलपेन्ट लावणं कठीण होऊन जातं अशावेळी गोंधळून जाण्याची गरज नाही. घरच्या घरी करता येणाऱ्या काही सोप्या उपायांनी तुम्ही सहज नेलपेन्ट रिमुव्ह करू शकता. जाणून घेऊयात अशा उपायांबाबत ज्यामुळे तुम्ही सहज नेलपेंट रिमुव्हरशिवाय नखांवरील नेलपेन्ट काढू शकता...
गरम पाणी
नखांवरील नेलपेन्ट काढण्यासाठी गरम पाणी फायदेशीर ठरतं. त्यासाठी एका बाउलमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये साधारण 10 मिनिटांपर्यंत नख बुडवून ठेवा. त्यानंतर कापसाने नखं साफ करा. त्यामुळे नेलपॉलिश सहज निघून जाईल.
डियोड्रंट
डियोड्रंटही नखांवरील नेलपेन्ट काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी नखांवर लावण्यात आलेल्या नेलपेन्टवर डियोड्रंट स्प्रे करा आणि लगेच कापसाने पूसून घ्या. नेलपेन्ट निघून जाईल.
हॅन्ड सॅनिटायझर
हॅन्ड सॅनिटायझर अनेकदा आपल्याकडे असतं. पाण्याशिवाय हात स्वच्छ करण्याचं काम हॅन्ड सॅनिटायझर करतं. याव्यतिरिक्त नखांवरील नेलपेन्ट काढून टाकण्यासाठीही हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करण्यात येतो. कापसाच्या मदतीने हॅन्ड सॅनिटायझर नखांवर लावा. त्यामुळे नखांवरील नेलपेन्ट निघून जाण्यास मदत होईल.