थ्रेडिंग केल्यानंतर त्वचेची जळजळ होतेय?; मग हे उपाय करा अन् समस्या दूर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 05:57 PM2019-09-16T17:57:19+5:302019-09-16T17:58:10+5:30
चेहरा आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. आयब्रो म्हणजेच, थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांच्या आजूबाजूच्या त्वचेवर जळजळ होते किंवा त्याठिकाणच्या त्वचेवर सूज येते.
चेहरा आणि डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यासाठी अनेक महिला आयब्रो करतात. आयब्रो म्हणजेच, थ्रेडिंग केल्यानंतर भुवयांच्या आजूबाजूच्या त्वचेवर जळजळ होते किंवा त्याठिकाणच्या त्वचेवर सूज येते. एवढचं नाहीतर अनेकदा त्वचा लालसर दिसू लागते. थ्रेडिंग करताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. तर दोऱ्याचा वापर करून आयब्रोना शेप दिला जातो. पण अनेकदा थ्रेडिंग झाल्यानंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण लक्षात ठेवा अशावेळी क्रिमचा वापर करू नका. अनेकदा डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्याशिवाय क्रिमचा वापर केल्यास त्वचेला साइड इफेक्ट्स होतात. त्यापेक्षा घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासापासून सुटका करून घेऊ शकता.
थ्रेडिंग केल्यानंतर टोनरचा वापर करा
टोनरमध्ये कूलिंग इफेक्ट असतात. जे थ्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या जळजळीपासून सुटका करण्यास फायदेशीर ठरतं. त्यामुळे सूजही कमी होते. एका कापसाच्या बोळ्यावर थोडं टोनर घेवून ते जळजळ होत असलेल्या त्वचेवर लावा. थ्रेडिंगमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात. टोनर त्वचेचं पोर्स बंद करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
दूध
दूधामध्ये असलेले प्रोटीन थ्रेडिंग केल्यानंतर होणारी जळजळ, त्वचेवरील लाल चट्टे आणि सूज दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. दूध कापसाच्या मदतीने प्रभावित झालेल्या त्वचेवर लावा.
कोरफडीचं जेल
त्वचेवर होणारी जळजळ आणि लाल चट्टे दूर करण्यासाठी कोरफडीचा गर फायदेशीर ठरतो. कोरफडीचं जेल आयब्रोच्या आजूबाजूच्या त्वचेवर लावा. कोरफडीमध्ये कूलिंग इफेक्ट असतात. जे जळजळ दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
बर्फामुळे जळजळीपासून सुटका
लाल झालेल्या त्वचेसोबतच सूज आणि जळजळीवर बर्फ परिणामकारक ठरतो. थ्रेडिंग केल्यानंतर जेव्हाही त्या भागावर लाल चट्टा तयार झाल्यास किंवा जळजळ होत असल्यास आइस क्यूबने मसाज करा.
काकडी
काकडीमध्ये एनजेसिक इफेक्ट्स असतात. जे थ्रेडिंगनंतर होणारी जळजळ दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. याव्यतिरिक्त यामध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे आयब्रोच्या आसपासच्या त्वचेवर होणारी जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. काकडीचा तुकडा 10 मिनिटांसाठी आयब्रोवर ठेवल्याने जळजळ दूर होण्यास मदत होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)