Navratri 2018 : ग्लोइंग स्किनसाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये 'या' 5 पदार्थांचं करा सेवन!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:40 AM2018-10-10T11:40:05+5:302018-10-10T11:48:37+5:30
शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे.
शारदीय नवरात्रौत्सवास सुरूवात झाली असून आज घटस्थापनेचा दिवस. आज पहाटेपासूनच राज्यभरात देवींच्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. याचसोबत नवरात्रीच्या उपवासांनाही सुरुवात झाली आहे. नऊ दिवसांचा उपवास पार पाडण्यासाठी सर्वजण अनेक गोष्टींची काळजी घेताना दिसत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा 5 पदार्थांबाबत सांगणार आहोत, जे पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता. त्याचबरोबर हे स्किनसाठीही फायदेशीर ठरतील. यांच्या सेवनाने स्किन उजळण्यास आणि मुलायम होण्यास मदत होईल.
1. शिंगाडा
नवरात्रीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये शिंगाडा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. हा उपवासात खाण्यात येणाऱ्या पदार्थांमधील सर्वात कॉमन पदार्थ आहे. शिंगाड्यामध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे त्वचेवरील मृत पेशींना आतून ठिक करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे त्वचा आपोआप उजळण्यास मदत होईल.
2. ड्राय फ्रुट
काजू, बदाम, अक्रोड यांसारखे स्रव ड्रायफ्रुट्स स्किनसाठी फायदेशीर ठरतात. काजूमध्ये डॅमेज झालेले स्किन सेल्स रिपेअर करण्यासाठी आवश्यक असे गुणधर्म असतात. अक्रोड खाल्याने स्किन टाइट होते आणि स्किनवर सुरकूत्या दिसत नाहीत. त्याचप्रमाणे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी आणि त्वचेचं तारूण्य टिकवण्यासाठी बदामाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं. दिवसातून 3 ते 4 बदाम खाणं स्किनसाठी फायदेशीर ठरतं.
3. भोपळ्याच्या बिया
नवरात्रीच्या उपवासादरम्यान भोपळ्याच्या बियाही खाण्यात येतात. या बिया थोड्याशा भाजून खाता येतात. भोपळ्याच्या बिया खाल्याने स्किन उजळण्यास आणि नॅचरल ग्लो येण्यास मदत होते.
4. दही
जर तुम्हाला ग्लोइंग स्किन हवी असेल तर तुमची स्किन आतून डीटॉक्सीफाय करणं गरजेचं आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी2, बी6 आणि बी12 मुबलक प्रमाणात असतं. जे स्किन डीटॉक्सीफाय करण्यासोबतच मुलायम आणि ग्लोइंग बनवतं.
5. साबुदाणा
नवरात्रीमध्ये साबुदाण्याचं सेवन फार केलं जातं. हेही तुमच्या स्किनसाठी फायदेशीर असतं. फक्त साबुदाण्यापासून कोणताही पदार्थ तयार करताना कमी तेलाचा वापर करावा.