इंस्टेंट ग्लोसाठी वापरा केळ्यापासून तयार फेसपॅक!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 12:09 PM2019-01-18T12:09:01+5:302019-01-18T12:09:40+5:30
अनेकदा असं होतं की, वेळेवर एखाद्या इव्हेंटला जावं लागतं किंवा सायंकाळी वेळेवर पार्टी ठरते.
अनेकदा असं होतं की, वेळेवर एखाद्या इव्हेंटला जावं लागतं किंवा सायंकाळी वेळेवर पार्टी ठरते. अशावेळी पार्लरला जाण्याचा वेळ तुमच्याकडे नसतो. त्यामुळे अशावेळी तुम्हाला गरज असते ती इंस्टेंट ग्लो देणाऱ्या ब्यूटी टिप्सची. घरीच तुम्ही असा एक फेसपॅक तयार करु शकता ज्याने तुम्हाला लगेच ग्लो करणारी त्वचा मिळेल. महत्त्वाची गोष्ट यासाठी तुम्हाला जास्त वेळही खर्ची करावा लागणार नाही.
इंस्टेंट ग्लो फेसपॅक
चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो हवा असेल तर तांदळाचं पीठ आणि केळ्यापासून तयार फेसपॅक चांगला पर्याय आहे. तांदळाच्या पीठामध्ये तेल शोषूण घेण्याचा गुण असतो आणि हे पीठ एक्सफोलिएटरच्या रुपातही काम करतं. तर केळ्याने चेहरा हायड्रेट होऊन मुलायम होतो. याचा वापर करुन तुम्ही चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो मिळवू शकता.
साहित्य
एक स्मॅश केलेलं केळं
३ चमचे तांदळाचं पीठ
१ चमचा मध
कसा कराल तयार?
चेहऱ्यावर इंस्टेंट ग्लो मिळवण्यासाठी तांदळाचं पीठ आणि केळ्याचा फेसपॅक तयार करण्यासाठी सर्वातआधी केळी बारीक करुन ते तांदळाच्या पीठात टाका. या दोन्हींची एक मुलायम पेस्ट तयार करा. यानंतर पेस्टमध्ये मध चांगल्याप्रकारे मिश्रित करा. आता हा फेसपॅक चेहऱ्यावर सगळीकडे लावा. १५ मिनिटे हा फेसपॅक तसाच राहू द्या. १५ मिनिटांनी हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा आणि चेहरा पाण्याने धुवून घ्या. चेहऱ्यावर तुम्हाला इंस्टेंट ग्लो दिसायला लागेल.