​झोपेत होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून मुक्ती देणारे नवे यंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2016 05:12 PM2016-09-02T17:12:38+5:302016-09-02T22:48:54+5:30

‘सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया’वर (सीएसए) प्रभावी इलाज करणारे इम्लांट डिव्हाईस विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे.

New equipment to relieve respiratory distress | ​झोपेत होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून मुक्ती देणारे नवे यंत्र

​झोपेत होणाऱ्या श्वसनाच्या त्रासापासून मुक्ती देणारे नवे यंत्र

Next
ेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया’वर (सीएसए) प्रभावी इलाज करणारे इम्लांट डिव्हाईस विकसित करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. ‘सीएसए’ असलेल्या लोकांच्या मेंदूचे झोपेत श्वसनक्रियेवर नियंत्रण नसते. त्यामुळे झोपे दरम्यान श्वसनात अनेक समस्या निर्माण होतात. यावर कार्यक्षम उपचार निर्माण करण्यात आल्याचा दावा एका अध्ययनाद्वारे करण्यात आला आहे. 

ओहायओ स्टेट युनिव्हर्सिटी वेक्सनर मेडिकल सेंटरमधील संशोधक विल्यम अब्राहम यांनी सांगितले की, ‘हृदय बंद पडलेल्या एक तृत्यांश रुग्णांना ‘सीएसए’चा त्रास असतो. ही खूप चिंतेची बाब आहे. यामुळे हृदयाची स्थिती आणखी खालावण्याचीदेखील शक्यता असते. सध्या यावर शंभर टक्के इलाज करणाऱ्या उपचार पद्धती उपलब्ध नाहीत.’

‘पॉझिटिव्ह एअरवेव्ह प्रेशर’ डिव्हाईसचा यावर उपचार म्हणून वापर करण्यात येतो; मात्र अनेक अध्ययनांतून त्यांची अपयुक्तता सिद्ध झाली आहे. प्रस्तूत संशोधकांच्या गटाने या नव्या ‘ट्रान्सव्हेनस फ्रेनिक नर्व्ह स्टिम्युलेटर’ डिव्हाईसची अमेरिका, जर्मनी आणि पोलंड येथील ३१ हॉस्पिटल्समध्ये चाचणी केली आहे.

पेसमेकर प्रमाणेच हे डिव्हाईस झोपेमध्ये मेंदूला संदेश पाठवते. एकूण १५१ रुग्णांमध्ये हे डिव्हाईस इम्लांट करण्यात आले. पहिल्या सहा महिन्यांत यांपैकी ६८ डिव्हाईसेस उपचारासाठी सक्रीय करण्यात आली तर उर्वरित ७३ डिव्हाईसेस ‘नियंत्रित गट’ म्हणून इनअ‍ॅक्टिव्ह ठेवण्यात आली. सहा महिन्यांनंतर करण्यात तपासणी केली असता या डिव्हाईसमुळे ‘सीएसए’ इव्हेंटस्मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट दिसून आली.

Web Title: New equipment to relieve respiratory distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.