पिंपल्समुळे होऊ शकते 'ही' गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:17 AM2019-08-28T11:17:06+5:302019-08-28T11:21:55+5:30

अनेकदा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्येमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा तर पिंपल्स येतात पण त्यामागील कारण समजतचं नाही. हे पिंपल्स चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात.

New research says that acne on face may cause depression symptoms | पिंपल्समुळे होऊ शकते 'ही' गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध

पिंपल्समुळे होऊ शकते 'ही' गंभीर समस्या; वेळीच व्हा सावध

googlenewsNext

अनेकदा त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे किंवा आरोग्याच्या समस्येमुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात. अनेकदा तर पिंपल्स येतात पण त्यामागील कारण समजतचं नाही. हे पिंपल्स चेहऱ्याचं सौंदर्य बिघडवण्याचं काम करतात. चेहऱ्यावर एखादा पिंपल आल्यामुळे अनेकदा आपण हैराण होतो. तो पिंपल घालवण्यासाठी अनेक उपाय करतो. पण काही फायदा होत नाही. जर तुमच्याही मनात सतत पिंपल्सचे विचार येत असतील तर, वेळीच सावध व्हा. कारण चेहऱ्यावर साधारण दिसणाऱ्या पिंपल्समुळे डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते. 

1986 ते 2012च्या आकड्यांचं विश्लेषण 

वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, अशा व्यक्ती ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. त्यांच्यामध्ये डिप्रेशन विकसित होण्याचा धोका वाढतो. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पिंपल्समुळे विकसित झालेल्या डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका पिंपल्स आल्यानंतर साधारणतः 5 वर्षांपर्यंतच राहतो. ब्रिटिश जर्नल ऑफ डर्मेटोलॉजीने युनायटेड किंग्डममधील 'द हेल्थ इंप्रूवमेंट नेटवर्क'च्या 1986 ते 2012 पर्यंतच्या आकड्यांचे विश्लेषण केले. 

पिंपल्समुळे डिप्रेशनचा धोका 63 पटींनी वाढतो

'द हेल्थ इंप्रूवमेंट नेटवर्क'च्या अहवालातून समोर आलेल्या आकड्यांच्या विश्लेषणाच्या आधारावर वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, पिंपल्समुळे डिप्रेशनचा धोका अधिक वाढतो. या संशोधनातून असं सिद्ध झालं की, पिंपल्स आल्यानंतरच्या एका वर्षातच डिप्रेशनची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक असतो. ज्या लोकांना पिंपल्स येत नाहीत त्यांच्या तुलनेत पिंपल्स येणाऱ्या व्यक्तीमध्ये डिप्रेशनचा धोका 63 टक्क्यांनी जास्त अधिक असतो. तसेच डिप्रेशनची समस्या होण्याची शक्यता एक वर्षांनी कमी होते. 

त्वचेच्या डॉक्टरांनी डिप्रेशनची लक्षणंही ओळखली पाहिजेत... 

त्वचेच्या डॉक्टरांनी पिंपल्सने पीडित असणाऱ्या व्यक्तींमध्ये डिप्रेशनची लक्षणं तर नाहीत ना? याची तपासणी करणं आवश्यक असतं. तसेच याची शक्यता कमी करण्यासाठी त्वरित उपचार सुरू केले पाहिजेत. जर उपचारा दरम्यान डिप्रेशनबाबत कोणतीही समस्या दिसून आली तर अशा परिस्थितीत मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणंही गरजेचं असतं. 

टिप : वरील गोष्टी या संशोधनातून सिद्ध झालेल्या असून त्या आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: New research says that acne on face may cause depression symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.