Women use filter edit : तुमचीही होऊ शकते फसवणूक; ९० टक्के महिला फिल्टर अन् एडीट करूनच फोटो पोस्ट करतात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:24 PM2021-03-19T18:24:34+5:302021-03-19T19:05:04+5:30

Women use filter edit before posting research :  कोरोना काळात या प्रकारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Ninety per cent young women use filter edit their photos before posting research | Women use filter edit : तुमचीही होऊ शकते फसवणूक; ९० टक्के महिला फिल्टर अन् एडीट करूनच फोटो पोस्ट करतात

Women use filter edit : तुमचीही होऊ शकते फसवणूक; ९० टक्के महिला फिल्टर अन् एडीट करूनच फोटो पोस्ट करतात

googlenewsNext

आजकाल महिलांमध्ये सेल्फी काढण्याची किती क्रेझ असते हे काही वेगळं सांगायला  नको, कोणताही कार्यक्रम असो खाणं पिणं, बोलणं-चालणं राहिलं बाजूला आधी महिलांना आपले फोटो काढण्यातच खूप इन्टरेंस्ट वाटतो. कधी एकदा तो फोटो सोशल मीडियावर  जातोय असंच या महिलांना वाटत असतं. आता एका नव्या संशोधनानुसार 90  टक्के स्त्रिया इंटरनेटवर फोटो पोस्ट करण्यापूर्वी आपले फिल्टर किंवा इडीट केलेले फोटो वापरतात. निकाल असं दर्शवितात की महिला सतत नवनवीन फिल्टर्स शोधत असतात.  कोरोना काळात या प्रकारात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

जास्तीत जास्त महिला एडीट करूनच ऑनलाईन फोटो सोशल मीडियावर टाकतात. संशोधनात असे दिसून आले आहे की महिला त्यांच्या त्वचेचे टोन, जबडा किंवा नाकाचे नवीन आकार, त्यांची चमकदार त्वचा आणि पांढरे दात देखील फिल्टरनं एडीट करतात. सिटी ऑफ लंडन युनिव्हर्सिटीच्या रोजालिंद गिल यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, दररोज सुमारे १० कोटी असे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जातात, आपण कधीही अशा नेत्रहिन समाजात राहिलेलो नाही.

या संशोधनातून समोर आलं की, सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स मिळाल्यानं महिलांना खूप आनंद होतो. आकर्षणाचे केंद्रबिंदू महिला या सुंदर फोटोंमुळे ठरतात. पण तरूण मुलींसाठी ही फारच  गंभीर बाब आहे. या रिसर्चसाठी संशोधकांनी जवळपास २०० तरूण महिलांना आणि ब्रिटनच्या गैर द्वीआधारी लैंगिंक संघाचा भाग बनवलं आहे. गैर-द्विआधारी लोकांमध्ये  बायजेंडर, पॅनजेंडर आणि एजेंडर अशा लोकांचा समावेश होतो. 

कोरोना काळात या प्रकारात वाढ

अहवालानुसार, महिलाच्या अशा प्रकारच्या फोटोंमुळे तरुणांनी मास मीडियावर सतत संताप व्यक्त केला आणि त्यांनी सौंदर्याच्या अगदी सूक्ष्म व्याख्येवरही लक्ष केंद्रित केले. संशोधनात सामील असलेल्या तरुण स्त्रियांनी या नियमित जाहिराती पाहिल्या किंवा विशेषत: दात स्वच्छ करण्यासाठी, ओठ फिल्टर करण्यासाठी आणि छातीत, खालच्या मागच्या बाजूला किंवा नाकात वाढ करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी कॉस्मेटिक प्रक्रियेचे नोटीफिकेशन्स पाहिले होते. VIDEO : चोरी करायला गेला अन् ३ तास ग्रीलमध्ये तसाच अडकून राहिला!

पूश नोटिफिकेशन्स अशाप्रकारे मेसेज असतात. जे वापरकर्त्याच्या फोनमध्ये आल्यानंतर  पॉप अप होतात. रिपोर्टनुसार या नोटिफिकेशन्समधून वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात रंग, नाकाचा आकार, ओठांचा आकार ए़डिटींग अॅपचा वापर करून बदलता येऊ शकतो.  मोठ्या संख्येनं महिला अशा प्रकारच्या एप्सचा वापर करतात. बापरे! वेळेच्या २ मिनिटं आधीच ऑफिस सोडलं म्हणून सरकारी कामगाराचा कापला पगार अन्...

Web Title: Ninety per cent young women use filter edit their photos before posting research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.