'नको' रे दुरावा !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2016 11:51 AM2016-07-28T11:51:05+5:302016-07-28T17:21:05+5:30

घटस्फोट झाल्यानंतरही बॉलिवुडमधील मंडळी आपल्या पूर्वपती अथवा पत्नीसोबत मैत्रीचे नाते कसे टिकवू शकतात हा आपल्या सामान्यांना नेहमीच प्रश्न पडतो. आमिर खानने काही वर्षांपूर्वी रिना दत्ताला घटस्फोट देऊन किरण रावशी लग्न केले. पण आजही आमिरच्या घरगुती समारंभात रिना आमिरसोबत असते. तसेच रणबीर आणि कतरिनाचे ब्रेकअप झाल्यानंतरही ते दोघे जग्गा जासूस या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.

'No' Really! | 'नको' रे दुरावा !

'नको' रे दुरावा !

Next
class="gmail_quote" style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">
घटस्फोट झाल्यानंतरही बॉलिवुडमधील मंडळी आपल्या पूर्वपती अथवा पत्नीसोबत मैत्रीचे नाते कसे टिकवू शकतात हा आपल्या सामान्यांना नेहमीच प्रश्न पडतो. आमिर खानने काही वर्षांपूर्वी रिना दत्ताला घटस्फोट देऊन किरण रावशी लग्न केले. पण आजही आमिरच्या घरगुती समारंभात रिना आमिरसोबत असते. तसेच रणबीर आणि कतरिनाचे ब्रेकअप झाल्यानंतरही ते दोघे जग्गा जासूस या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. 
ब्रेकअप झाल्यानंतर अथवा घटस्फोट झाल्यानंतर आपल्या जोडीदाराचे तोंडही परत पाहाण्याची अनेकांना इच्छा नसते. पण आजची पिढी या गोष्टीकडे खूप वेगळ्यारितीने पाहायला लागली आहे. ब्रेकअपनंतरही आपण आपल्या पूर्व प्रियकरासोबत खूप चांगली मैत्री टिकवू शकतो असे अनेकांना वाटते. पण या सगळ्यामुळे आपल्या जोडीदारासोबतच्या आपल्या नात्यात दुरावा येणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या पूर्वप्रियकरासोबत अथवा प्रेयसीसोबत ब्रेकअपनंतरही मैत्री टिकवताना या काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. 
आपल्या पूर्वप्रियकर अथवा पूर्वप्रेयसीसोबत आयुष्यभर मैत्री ठेवण्याचा विचार करत असाल तर तुमच्या या मैत्रीमुळे तुमचा जोडीदार दुखावला जाणार नाही याची सगळ्यात पहिल्यांदा काळजी घेणे आवश्यक आहे. जोडीदारापासून काहीही लपवू नये असे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे एक नाते तोडून तुम्ही दुसऱ्या नात्यात जात असताना कोणतीही गोष्ट न लपवलेलीच चांगली. तुमचा पूर्वप्रियकर अथवा पूर्वप्रेयसी मैत्रीच्या नात्याने तुमच्या भविष्यात तुमच्यासोबत असणार आहे याची जोडीदाराला कल्पना द्या. त्याबाबत त्याचे मतही जाणून घ्या. यामुळे तुमच्यावरील जोडीदाराचा विश्वास वाढेल. मित्रमैत्रिणींना तुम्हाला भेटायला जाताना तुमचे पूर्वप्रियकर अथवा पूर्वप्रेयसीदेखील येणार असल्यास जोडीदाराला अाधीच सांगा. तसेच गेटटुगेदरला जोडीदार सोबत येत असल्यास पूर्वप्रियकर अथवा पूर्वप्रेयसीसोबत गप्पा गोष्टी करण्यात जोडीदाराकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात असे त्याला वाटत नाही याची खात्री करा. पूर्वप्रेयसी अथवा पूर्वप्रेयसीच्या सतत संपर्कात राहाणे टाळा. तसेच त्याच्या समस्यांपासून दोन हात दूर राहायला शिका अथवा तुम्ही आजही त्याच्याबद्दल तितकाच विचार करता असे तुमच्या जोडीदाराला वाटू देऊ नका. 
ब्रेकअपनंतरही फ्रेंडस म्हणून राहाणारे अनेक सेलिब्रेटी असल्याने आपणही त्यांच्यासारखे वागावे. एखादी व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य नसला तरी मित्र म्हणून आपल्याला कायम साथ देऊ शकतो असे अनेकांना वाटते. पण आपल्या पूर्वप्रियकर अथवा पूर्वप्रेयसीला आपल्या आयुष्यात आणताना त्यांच्या खाजगी आयुष्यात ढवळावढवळ आपण करणार नाही आणि आपणदेखील त्याच्या आयुष्यात डोकावणार नाही याची नक्कीच काळजी घ्या. 

 

Web Title: 'No' Really!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.