फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतं कारलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 03:41 PM2019-01-24T15:41:55+5:302019-01-24T15:52:16+5:30
कारलं म्हटलं की, सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्याचा कडवटपणा आठवतो. त्याच्या कडवट चवीमुळेच अनेक लोक कारलं खाणं टाळतात. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, कारलं आरोग्यासाठीच नाही तर स्किन आणि ब्युटीसाठीही फायदेशीर ठरतं.
कारलं म्हटलं की, सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि त्याचा कडवटपणा आठवतो. त्याच्या कडवट चवीमुळेच अनेक लोक कारलं खाणं टाळतात. परंतु तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, कारलं आरोग्यासाठीच नाही तर स्किन आणि ब्युटीसाठीही फायदेशीर ठरतं. कारल्याचे अनेक फायदे आहेत. जे त्वचेचं सौंदर्य नैसर्गिकरित्या खुलवण्यासाठी मदत करतात. आज आम्ही तुम्हाला कारल्याचे 5 ब्युटी बेनिफिट्स सांगणार आहोत. जे त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासोबतच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही मदत करतात.
अॅन्टी-एजिंग
जर तुम्ही तुमच्या सौंदर्याच्या आड येणाऱ्या वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे हैराण असाल तर कारल्याचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरेल. कारल्यामध्ये मुबलक प्रमाणावर व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतं. परंतु याचा अर्थ असा नाही की, तुम्ही खूप साऱ्या तेलामध्ये प्राय करून कारलं खावं किंवा मसालेदार पदार्थांसोबत कारलं तयार करावं. असं करण्याऐवजी कारलं उकळून त्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून त्याचा आहारामध्ये समावेश करावा. त्यामुळे फायदा होईल.
ब्लड प्यूरीफायर
कारलं अॅन्टी-ऑक्सिडंट म्हणून अत्यंत फायदेशीर आहे. जे शरीरातील सर्व नुकसानदायक टॉक्सिन्स आणि अशुद्ध घटक बाहेर टाकून त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच सुंदर आणि हेल्दी करण्यासाठी मदत करतो.
स्किन क्लिन्जर
दोन चमचे कारल्याच्या रसामध्ये 2 चमचे संत्र्याचा रस एकत्र करा. त्यानंतर कॉटन बॉलने चेहऱ्यावर लावून चेहरा स्वच्छ करा. जेव्हा तुमचा फेस ड्राय होईल त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला स्वत-लाच काही वेळाने फरक जाणवेल. त्वचा आधीपेक्षाही जास्त ग्लोइंग दिसेल.
अॅन्टी-मायक्रोबियल
जर तुम्हाला अनेकदा पिंपल्स, रॅशेज आणि त्वचेच्या इतर समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशावेळी दररोज तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यांसोबत एकत्र करून कारल्याचा ज्यूल प्या. लवकरच त्वचेच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी मदत होईल आणि तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
नॅचरल ग्लो
चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी कारल्याचा फेसपॅक उत्तम पर्याय आहे. बाजारामध्ये कारल्याचे अनेक फेसपॅक उपलब्ध आहेत. जर तुम्ही रेडिमेड फेसपॅक वापरण्याऐवजी घरगुती फेसपॅक वापरण्याचा विचार करत असाल तर कारल्याचा फेसपॅक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. त्यासाठी कारलं घेऊन त्यातील बिया काढून टाका आणि प्यूरी तयार करून घ्या. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण काही वेळासाठी लावून थोडा वेळ तसचं ठेवा. सुकल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाका. त्वचेवर नॅचरल ग्लोसाठी आठवड्यातून एकदा तरी नक्की ट्राय करा.