आता घरीच बनवा ‘लिपस्टीक’ !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2017 10:10 AM2017-03-18T10:10:06+5:302017-03-18T16:55:02+5:30

बाजारात मिळणाऱ्या लिपस्टीकचे दुष्परिणाम होतात हे आपणास माहितच आहे. काही प्रमाणात हर्बल लिपस्टीकही बाजारात आल्या आहेत, मात्र काही सोप्या पद्धती वापरुन आपण घरच्या घरीच लिपस्टीक बनवू शकता.

Now make a lipstick at home! | आता घरीच बनवा ‘लिपस्टीक’ !

आता घरीच बनवा ‘लिपस्टीक’ !

Next
जारात मिळणाऱ्या लिपस्टीकचे दुष्परिणाम होतात हे आपणास माहितच आहे. काही प्रमाणात हर्बल लिपस्टीकही बाजारात आल्या आहेत, मात्र काही सोप्या पद्धती वापरुन आपण घरच्या घरीच लिपस्टीक बनवू शकता. 

साहित्य काय घ्याल?
एक बीट, अर्धा चमचा मधमाश्यांचे मेण, अर्धा चमचा शिया किंवा कोको बटर आणि अर्धा चमचा खोबरेल तेल

कशी तयार कराल लिपस्टीक?
धारदार सुरीने बीटाचे पातळ काप करून घ्या. हे काप सुकू द्या. डिहायड्रेटरमध्ये हे काप ठेवून १२० डिग्रीवर ६ ते ८ तास ठेवा. आपल्या आवडीच्या रंगासाठी तुम्ही बीटसोबत इतर रंगाच्या चेरीचा उपयोग करू शकता. बीट पूर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरमधून त्याची पावडर बनवा. 

मंद आचेवर एक छोटे भांडे ठेवून त्यात १ ते २ इंच पाणी टाका. नंतर त्यात मेण, कोको बटर, खोबरेल तेल व बीट पावडर टाका. चांगले ढवळून घ्या. रंग गडद नसेल तर आणखी पावडर टाका. चांगले घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून मऊ कपड्याने गाळून घ्या. लिप कंटेनरमध्ये हे मिश्रण ओता. अर्ध्या तासाने थंड झाल्यावर तुमचे लिपस्टीक तयार.

Web Title: Now make a lipstick at home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.