भारतात टूथब्रश न वापरणाऱ्याची संख्या मोठी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2016 03:50 PM2016-08-05T15:50:29+5:302016-08-05T21:20:29+5:30

निम्म्या लोकांकडे टुथब्रश नसल्याचे इंडियन डेंटल मेडिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

The number of toothbrushes in India is huge | भारतात टूथब्रश न वापरणाऱ्याची संख्या मोठी

भारतात टूथब्रश न वापरणाऱ्याची संख्या मोठी

Next

/>उत्तम आरोग्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. भारतात जवळपास ९५ टक्के नागरिकांना हिरड्यांचे आजार आहेत. कारण की, आजही ग्रामीण भागात दात घासण्यासाठी कोळसा किंवा राखेचाच वापर केला जातो. देशात आजही निम्म्या लोकांकडे टुथब्रश नसल्याचे इंडियन डेंटल मेडिकल असोसिएशनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

विशेष म्हणजे यामध्ये १५ वर्षाखालील मुलांचे दात किडणाचे प्रमाण हे अधिक आहे. लहान मुलांना बाटलीद्वारे दुध पाजल्यानेसुद्धा त्याचा परिणाम दातावर होत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. लहान बाळाला बाटलीद्वारे दुध पाजल्यानंतर त्याच्या हिरड्या व दात स्वच्छ कपडाने पुसण्याची गरज आहे. त्याचबरोबर दंत तज्ज्ञाकडेही जाणे आवश्यक आहे. परंतु, आपल्या देशात दात त्रास देत असेल तेव्हाच डॉक्टरांकडे जाण्याचा प्रघात आहे. त्यामुळे दाताचे विविध प्रकारचे आजार दिवसेंदिवस बळावत चालले आहेत.

या दाताच्या आजारापासून अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. त्याकरिता दाताची स्वच्छता ही प्रत्येकाने राखायलाच हवी. हृदयाशी संबंधित आजारही दातामुळे होत असल्याचे इंडियन डेंटल मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. दिवसातून दोन ब्रश करण्याचा डेन्टिस्ट सल्ला देतात.

 

Web Title: The number of toothbrushes in India is huge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.