लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2016 10:19 AM2016-06-16T10:19:50+5:302016-06-16T15:49:50+5:30
वजन हे नेमके कशामुळे वाढते व त्यावरती काय उपाय आहे. याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Next
आजच्या जीवनशैलीत लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनली आहे. प्रारंभी अनेकजण या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परंतु, नंतरला हे वाढलेले वजन कमी करणे फार अवघड होऊन बसते. दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला वाढलेले वजन कमी करण्याकरिता घाम गाळताना अनेकजण दिसतात. वाढलेले वजन हे केवळ सौदर्यालाच बाधक नाही तर आरोग्यासंबंधी ह्दयरोग, मधुमेह आदी आजाराचीही उत्पत्तीही होते. त्यामुळे आजघडीला सेलिब्रेटीसह अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे फंडे अवलंबवितात.
वजन कमी करण्याचे उपाय
शारीरिक हालचाली या नियमितपणे असाव्यत. किमान सात तास सलग झोप घ्यावी. आहार हा संतुलित असणे फार आवश्यक आहे. तळलेले पदार्थ खाणे टाळावे. आनंदी राहण्यावर भर द्यावा. जास्त काबोर्हायेड्रेट असणारे पदार्थ खाणे टाळावे. साखर, बटाटा व तांदळामध्ये जास्त प्रमाणात काबोर्हायेड्रेट असून यामुळे चरबी वाढते. गहू, सोयाबीन व हरभरे मिश्रित पिठाची पोळी खावी. तसेच दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावे. पत्ताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. त्यामुळे दररोज पत्ताकोबीचे ज्यूस घ्यावा.
नियमीत पपई ख्यावी, त्यामुळे कंबरेची अतिरिक्त चरबी कमी होते. घरी तयार करण्यात आलेले ताक रोज एक ग्लास घ्यावे. त्यामध्ये स्वादाकरिता काळे मीठ, हिंग, जीरा पावडर टाकावे. कारल्याची अर्धवट कच्ची भाजी खावी. आवळा व हळद ताकामध्ये टाकून पिवून घ्यावे. पुदिन्याच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून प्यावे. गाजरांचा आहारात भरपूर प्रमाणात समावेश करावा. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात एक चमचा मध टाकून पिवून घ्यावे. अर्धा कप कॉफीमध्ये थोडे गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस टाकून हे मिश्रण व्यायाम करण्याच्या अगोदर पिवून घ्यावे. व्यायाम केल्यानंतर नियमीत कपभर पाण्यात एक चमचा ओव्याचे दाणे टाकून उकळून ते पिवून घ्यावे. कपभर उकळलेल्या पाण्यात दालचिनीचा तुकडा टाकून १० मिनीटानंतर ते पाणी गाळून प्यावे.
वजन वाढण्याचे कारणे
रात्रीला झोपण्यापूर्वी पिझ्झा, बर्गर हे जंक फूड खाल्याने व अपूर्ण झोपे. पाणी कमी प्रमाणात सेवन करणे. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने सुद्धा वजन वाढते. धावपळीमुळे फळे व हिरव्या पालेभाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होणे.शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरीज मिळणे. एका ठिकाणी जादा वेळ इंटरनेटवर बसून राहणे. औषधांची अतिसेवन करणे हे सुद्धा वजन वाढण्याचे कारणे आहेत.
चौकट
बॉलीवूड स्टारचे फंडे
बॉलीवूड स्टार अवलंबीत असलेल्या विविध फंड्यांची आपल्याक डे नेहमी चर्चा होते. त्याचबरोबर त्याचे अनुकरणही केले जाते. त्याचप्रमाणे वजन घटविण्यासाठी शिल्पा शेट्टी व अनिल कपूर या स्टारने केलेले हे फंडे. महिलांचे बाळंतपणानंतर वजन वाढल्याचे आपण नेहमी ऐकत असतो. परंतू, यास बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अपवाद ठरली आहे.
तिने २०१२ मध्ये बाळाला जन्म दिल्यानंतर वजन घटविण्यासाठी खूप मेहनत घेतली. तिचा ट्रेनर विनोद चन्ना यांनी सांगितल्याप्रमाणे तिने दररोज व्यायाम करुन, संतुलित आहार घेतला. त्यामुळे शिल्पाने तीन महिन्यात २१ किलो वजन घटविले. तसेच १४ जून २००२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या ‘बधाई हो बधाई’ या चित्रपटात अनिल कपूरनेही नियमित व्यायाम करुन, आपले वजन घटविण्यात आल्याचे दाखविण्यात आहे. तसेच अन्य स्टारही वजन घटविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फंडे अवलंबीत असतात.