​एक मिनिटांचा व्यायामदेखील पुरेसा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2016 02:03 PM2016-05-04T14:03:13+5:302016-05-04T19:33:13+5:30

केवळ एक मिनिट व्यायाम करूनही तुम्ही 45 मिनिटांच्या व्यायामाचा लाभ मिळवू शकता.

One minute exercise is also enough | ​एक मिनिटांचा व्यायामदेखील पुरेसा

​एक मिनिटांचा व्यायामदेखील पुरेसा

Next
ाळी लवकर उठून घाम गाळण्याचा बहुतेक जणांना कंटाळा येतो. जिमचे रुटीन पाहूनच अनेक जण धसका घेतात. काही जण सुरुवातीला उत्साहात व्यायाम सुरू करतात पण दुसऱ्या दिवशी अंग दुखू लागले की, त्यांचा व्यायाम बंद होतो.

तुम्हीदेखील अशा लोकांपैकी असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. रोज सकाळी उठून जिममध्ये तासन्तास घाम गाळण्याची काही गरज नाही. केवळ एक मिनिट व्यायाम करूनही तुम्ही 45 मिनिटांच्या व्यायामाचा लाभ मिळवू शकता.

अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनामध्ये ‘एंड्यूरन्स ट्रेनिंग’ आणि ‘इंटेन्स इंटरव्हल ट्रेनिंग’ची तुलना करण्यात आली. 25 बेडौल पुरुषांची तीन गटांत विभागणी करून त्यांचे अध्ययन करण्यात आले.

कंट्रोल ग्रुप, एंड्यूरन्स ग्रुप जे 45 मिनिट व्यायाम करायचे आणि तिसरा गट म्हणजे इंटरव्हल ग्रुप जो केवळ 10 मिनिट व्यायाम करायचा आणि त्यातही केवळ एकच कठोर व्यायाम असायचा. सर्व जण स्थिर सायकलवर व्यायाम करायचे.

तीन महिन्यांच्या निरीक्षणांतून असे दिसून आले की, एंड्यूरन्स ग्रुपने इंटरव्हल ग्रुपपेक्षा 21 तास जास्त व्यायाम केला; पण तरीही दोन्ही गटांतील पुरुषांमध्ये स्नायू, इन्सुलिन निर्मिती आणि एकंदर सहनशक्तीच्या बाबातीत समान प्रगती झाली. म्हणजेच एक मिनिटाचा इन्टेन्स व्यायाम (आणि नऊ मिनिटांचे वार्मअप व्यायाम) देखील 45 मिनिटे करण्यात येणाºया व्यायामा इतकाच प्रभावी आहे.

तर मग मला वेळ नाही असे कारण सांगून व्यायामाला फाटा मारू नका. कारण फक्त एक मिनिटाची बात आहे!

Web Title: One minute exercise is also enough

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.