जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी एक अॅंजेलिना जोलीचे 'ब्युटी सीक्रेट्स' आहेत खास, तुम्हीही करा ट्राय...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:34 PM2019-09-26T12:34:38+5:302019-09-26T12:34:45+5:30
सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे.
(Image Credit : Angelina Jolie/Instagram)
सहा मुलांची आई आणि जगातल्या सर्वात सुंदर महिलांपैकी असलेल्या हॉलिवूड अभिनेत्री अॅंजेलिना जोलीने ४० वर्षात फारच लांब प्रवास केला आहे. आपल्या भूतकाळापासून ते हॉलिवूडच्या सर्वात दिग्गजांमधील एक अभिनेत्री असलेली अॅंजेलिना फॅशन आणि ब्युटीच्या दुनियेतही लोकप्रिय आहे. अशात आज आम्ही तुम्हाला तिचे काही ब्युटी सीक्रेट्स सांगणार आहोत.
साधेपणाला कमी समजू नका...
न्यूड ग्लॉससोबत फ्रेश चेहरा, एक स्लिंकी ब्लॅक ड्रेस आणि बोल्ड रेड लिप्स बस एवढ्याच मेकअपमध्ये अॅंजेलिना कमालीची सुंदर दिसते. काही लोक तिच्या या ब्युटी पर्यायांना सेफ गेम म्हणू शकतात. अॅंजेलिना कधी ट्रेन्डच्या हिशोबाने चालत नाही. हा एक उत्तम पर्याय आहे. कारण साधेपणातही सौंदर्य असतं.
चांगले आयब्रो ठरतात वरचढ
अॅंजेलिनाचे ९०च्या दशकातील सिग्नेचर लूक कुणीही विसरू शकत नाही. क्रेझी प्लक ब्रो कुणीही विसरू शकत नाही. चांगले आयब्रो ब्रश आणि फिलरचा एक चांगला सेट तुमचा लूक बदलू शकतात. आयब्रोला इनहॅनसरच्या मदतीने सुंदर बनवणे एक कला आहे. याने चेहरा आणि डोळे आकर्षक होतात.
तुमच्यासाठी जे बेस्ट तेच वापरा
अॅंजेलिनाने गेल्या काही वर्षात ब्युटीबाबत वेगवेगळे प्रयोग केलेत. काही इतरांच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरले. पण शेवटी अॅंजेलिना तिची सिग्नेचर हेअरस्टाईल आणि मेकअपच वापरते. तेच तिच्यावर उठून दिसतं. साधारण कॅट आय, स्मोकी आय, क्लासिक updos, चमकती त्वचा आणि हेअरस्टाईल हे अॅंजेलिनाच्या ग्लॅमरस अवताराचे वेगवेगळे अंग आहेत.
अंतर्गत सुंदरता मेकअपपेक्षा अधिक महत्वाची
जर तुम्हाला अॅंजेलिना माहीत असेल तर तिच्याकडून हे शिकायला मिळतं की, व्यक्तीने मनाने सुंदर असावं. वरवरची सुंदरता वाढवण्यासाठी मेकअप करणं सामान्य कामांसारखंच एक काम आहे. अॅंजेलिना मानवतावादी आणि एक दानशूर महिला आहे. अॅंजेलिना दुसऱ्यांची मदत करून स्वत:ची सुंदरता बॅकअप करते. ज्यातून प्रत्येत महिलेला एक अनुभव मिळतो.