पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 12:26 PM2020-02-05T12:26:32+5:302020-02-05T12:31:22+5:30
सॉल्ट अँन्ड पेपर दाढी एक अशी दाढी आहे ज्यात पुरूषांच्या दाढीचे केस अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असतात.
सॉल्ट अँन्ड पेपर दाढी एक अशी दाढी आहे ज्यात पुरूषांच्या दाढीचे केस अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असतात. सध्याच्या काळात तरूणांमध्ये तसंच बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये हा ट्रेंड वायरल होत आहे. या प्रकारची दाढी ठेवणारे पुरूष खूपच आकर्षक आणि हार्डकोअर लुकवाले दिसतात. वाढत्या वयात हॅण्डसम दिसण्यासाठी ही दाढी खूपच परफेक्ट आहे. यासाठी तुम्हाला या दाढीला जाड आणि दाट बनवायला लागेल. तर काही लोक बिअर्ड लुकसाठी अशी दाढी ठेवण्यास खूप उत्सुक असतात. कारण दाढीमुळे पुरूषांचं व्यक्तीमत्व प्रभावी दिसत असतं.
अशी दाढी ठेवत असलेल्या पुरूषांमध्ये वेगळंच आकर्षण असतं. त्यांच्या त्वचेवर एक मॅच्युरीटी दिसायला सुरूवात होते. गेल्या काही दिवसात विराट कोहोली, एमएस धोनी, आणि सुनील शेट्टी सुद्धा या लूकमध्ये दिसून येत आहे. खरं म्हणजे वाढत्या वयात आपला लूक सुंदर बनवण्यासाठी ही दाढी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. कारण अनेक पुरूष आपल्या दाढीला काळा रंग येण्यासाठी प्रय़त्न करत असतात. पण या दाढीचा लूक खूपच सुंदर असतो. चला तर मग जाणून घेऊया ही दाढी ठेवत असताना कोणती काळजी घ्यायची. ( हे पण वाचा-सेलिब्रिटींचा बर्फाने तोंड धुण्याचा 'हा' फंडा तुम्हालाही आवडेल, साध्या पाण्याने तोंड धुणं सोडाल!)
दाढीला वाढू द्या आणि दाट होऊ द्या- सॉल्ट अँन्ड पेपर दाढी येण्यासाठी कोणतीही एक्स्ट्रा मेहनत तुम्हाला करावी लागणार नाही. फक्त दाढीला दाट होऊ द्या भरपूर वाढ होऊ द्या.
ट्रिमिंग करू नका- जर तुमची दाढी वाढली असेल तर प्लाकिंग आणि ट्रिमिंग करू नका. फक्त व्यवस्थित आकार देण्यासाठी दाढीच्या काठांना ट्रिम करा.
बिअर्ड नियमीत धुवा- एकदा दाढी वाढली तर काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यासाठी अल्कोहोल फ्री आणि सल्फेट फ्री बिअर्ड वॉश करा. दररोज थोड्या थोड्या वेळानंतर दाढीचे केस धुणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं डाय दाढीच्या केसांना लावू नका. स्मोकिंग करू नका कारण त्यामुळे बिअर्डवर नकारात्मक परिणाम होतो. सॉल्ट अँन्ड पेपर दाढी लावण्यासाठी असलेली प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यासाठी तुम्हाला सुट करेल अशा शेडची निवड करा. ( हे पण वाचा-महिन्यातून किती वेळा फेशियल करता? त्वचेचं होतय नुकसान,जाणून घ्या कसं)