'इथे' तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळीसाठी दूरदूरून येतात लोक, कारणही आहे खास!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 12:19 PM2019-03-05T12:19:40+5:302019-03-05T12:27:22+5:30
तुम्ही केवळ पाण्यानेच नाही तर दुधानेही काही लोक आंघोळ करत असल्याचं ऐकलं असेल. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल...
तुम्ही केवळ पाण्यानेच नाही तर दुधानेही काही लोक आंघोळ करत असल्याचं ऐकलं असेल. पण तुम्हाला हे वाचून धक्का बसेल की, जगात एक असाही देश आहे जिथे लोक कच्च्या तेलाने भरलेल्या बाथटबमध्येही आंघोळ करतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशात लोक केवळ तेलाने आंघोळ करण्यासाठीही येतात. आणि याचं कारणही खास आहे.
इराणजवळ असलेला देश अजरबेजानच्या नाफरलान शहरात एक असं हेल्थ सेंटर आहे जिथे लोक कच्च्या तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळ करतात. असे मानले जाते की, इथे आंघोळ केल्याने ७० पेक्षा अधिक आजार दूर होतात. तर तज्ज्ञांनी दावा केला आहे की, क्रूड ऑइल न्यूरोलॉजिकल आणि स्कीन संबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतं.
काय असतं क्रूड ऑइल?
खडकात आढळणाऱ्या नैसर्गिक तेलाला खनिज तेल म्हणतात.त्यामध्ये मृत्तिका, काही खनिजे, धातू इ. पदार्थही अल्प प्रमाणात असतात. अशा तेलाचे ऊर्ध्वपातनाने (वाफ करून व मग ती थंड करून द्रव पदार्थ मिळविण्याच्या क्रियेने) परिष्करण (शुद्धीकरण) करून त्यापासून गॅसोलीन (पेट्रोल), केरोसीन (रॉकेल), जळणासाठी वापरण्यात येणारा वायू इ. पदार्थ मिळवितात. म्हणून नैसर्गिक खनिज तेलाला कच्चे तेल(क्रूड ऑइल) असेही म्हणतात.
१३० लीटर तेलात आंघोळ
नाफतलान शहरातील या हेल्थ सेंटरमध्ये स्कीनच्या समस्यांसोबतच नसांसंबंधी समस्या दूर करण्यासाठीही दूरदूरून येतात. इथे क्रूड आइलचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करून उपचार केले जातात. यातील सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बाथटबमध्ये आंघोळ करणे हा आहे. यासाठी एका रुग्णाला ४० डिग्री तापमानावर १३० लीटर तेलात आंघोळ करतात.
अनेक लोकांचं म्हणणं आहे की, इथे गरम तेलाने आंघोळ केल्यावर त्यांच्या हाडांच्या जॉइंट्समध्ये फार आराम मिळतो. पण या तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळ करण्याला वेळेचं बंधन आहे. त्यापेक्षा जास्त वेळ बाथटबमध्ये बसू दिलं जात नाहीय कारण या तेलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या तत्त्वांमुळे त्यात जास्त वेळ बसल्याने शरीरावर वाईट प्रभाव पडतो. इतकंच काय तर या तेलात जास्त वेळ राहिल्याने व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो.
या हेल्थ सेंटरच्या डॉक्टरांनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये इते हजारो लोकांनी उपचार घेतले आहेत आणि त्यांना फार आरामही मिळाला आहे. एका रुग्णाला एका दिवसात केवळ एकदाच तेलात आंघोळ कऱण्याची परवानगी दिली जाते. ती सुद्धा केवळ १० मिनिटांसाठी. हा संपूर्ण कोर्स १० दिवसांचा असतो.