कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2016 02:34 PM2016-08-14T14:34:36+5:302016-08-14T20:04:36+5:30

प्रामुख्याने कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी चार किलोने जास्त असते.

People traveling by car are weighing more | कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त

कारने प्रवास करणाऱ्यांचे असते वजन जास्त

Next
ुनिक जीवनशैलीचा आपल्या आरोग्यावर फार वाईट परिणाम होतोय. आॅफिसमध्ये अधिक  काळ बैठे काम करावे लागत असल्यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामाना करावा लागत आहे. आपल्या प्रवासाची साधनं कोणती याचादेखील आपल्या वजनावर परिणाम होत असतो. यासंबंधी संशोधन केले असता आढळून आले की, प्रामुख्याने कारने प्रवास करणाऱ्या लोकांचे वजन सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांपेक्षा सरासरी चार किलोने जास्त असते.

आपली शारीरिक हालचाल आणि प्रवासाची विविध साधन यांचा संबंध काय हे शोधण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनात वरील रंजक तथ्य दिसून आले. त्यासाठी संशोधकांनी युरोप खंडीतील विविध दहा शहरांतील अकरा हजार स्वयंसेवकांचा अभ्यास केला. स्वयंसेवकांकडून ते शहरामध्ये कसे फिरतात, त्यांच्या प्रवासाचे प्रमुख साधनं कोणती आणि ते किती वेळ प्रवासामध्ये असतात, अशी माहिती मागवण्यात आली.

याबरोबरच स्वयंसेवकांच्या उंची व वजनाची नोंद घेण्यात आली. पायी चालणे आणि सायकल चालवण्याविषयी त्यांना काय वाटते याचीदेखील माहिती विचारण्यात आली. इम्पेरिअल कॉलेजचे संशोधक आॅड्रे डी नॅझेल यांनी सांगितले की, शहररचना, प्रवासाच्या साधनांचा उपयोग आणि मार्ग अशा घटकांचा आपल्या शारीरिक हालचालींवर मोठा परिणाम होत असतो. त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हे संशोधन केले.

Web Title: People traveling by car are weighing more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.