​पिंपल्स झालेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2016 03:05 PM2016-12-03T15:05:46+5:302016-12-03T15:08:11+5:30

महिला आणि पुरुषांच्या सौंदर्यात बाधा जर ठरत असेल तर ते म्हणजे पिंपल्स होय. या समस्येवर अनेकजण बराच उपाय करतात, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, मात्र अपेक्षित परिणाम मिळत नाही.

Pimples? | ​पिंपल्स झालेत?

​पिंपल्स झालेत?

Next
िला आणि पुरुषांच्या सौंदर्यात बाधा जर ठरत असेल तर ते म्हणजे पिंपल्स होय. या समस्येवर अनेकजण बराच उपाय करतात, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, मात्र अपेक्षित परिणाम मिळत नाही. यावर विशेषत: बाह्य सौंदर्य प्रसाधनांपेक्षा आहारात बदल करुन योग्य तो आहाराचा वापर केल्यास पिंपल्सवर नियंत्रण मिळू शकेल. 
आपल्या आहारात ग्लुटेनयुक्त पदार्थांचा समावेश असेल तो त्वरित खाणे टाळावे. त्यामुळे शरीरात जळजळ निर्माण होते आणि जर पोटात आणि घशात जळजळ होण्याची समस्या असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरपण दिसून येईल. आहारात साखरेचे प्रमाणही मर्यादेत असावे. साखरेमधील घटकांमुळे पिंपल्स वाढतात, म्हणून साखरेऐवजी मधासारख्या पर्यायाचा वापर करा. पिंपल्सवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या आहारात गाजर, पालक, व्हेजिटेबल सूप, पपई, खरबूज, शिमला मिरची यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. यामुळे त्वचेची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच चिकन, अंडी, फिश यांसारख्या प्रोटीन रिच पदार्थांचा वापर करा. यामुळे शुगर लेवल संतुलित होण्यास सुरुवात होईल. दही, मठ्ठा, ताक नियमित घेण्यास सुरुवात करा. यामुळे पचन सुधारण्यास मदत होते

Web Title: Pimples?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.