​पत्नीशी भांडण्यापूर्वी हे जरूर वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2016 04:29 PM2016-05-27T16:29:29+5:302016-05-27T21:59:29+5:30

जे पुरुष अधिक प्रमाणात त्यांचा राग बोलून दाखवितात त्यांना हृदयासंबंधी विकार (उदा. छातीत दुखणे, हाय ब्लड प्रेशर) होण्याची उद्भवण्याची शक्यता अधिक असते.

Please read this before fighting a wife | ​पत्नीशी भांडण्यापूर्वी हे जरूर वाचा

​पत्नीशी भांडण्यापूर्वी हे जरूर वाचा

Next
ा घरात राहिल्यावर भांड्याला भांड लागणारच. पती-पत्नीमध्ये वाद होतच असतात. परंतु या भांडणातून आपल्याला खूप काही शिकायला मिळू शकते.

पत्नीशी भांडतेवेळी जर पतीचे नीट निरीक्षण केले तर येणाऱ्या काळात त्याला कोणते आजार होण्याची शक्यता आहे याचा अंदाच बांधणे शक्य आहे, असे एका रिसर्चमध्ये आढळून आले आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाने केलेल्या संशोधनामध्ये 156 जोडप्यांच्या रेकॉर्ड केलेल्या भांडणांचा अभ्यास करण्यात आला.

भांडणांदरम्यान व्यक्तीचे भाव (दात खाणे, भुवया उंचावणे, आवाजाचा चढउतार, मुठ आवळणे, नजर चोरणे) आणि वीस वर्षांच्या कार्यकाळामध्ये जमा केलेल्या आरोग्यविषयक लक्षणांची तुलना करण्यात आली. 

त्यातून असे दिसून आले की, जे पुरुष अधिक प्रमाणात त्यांचा राग बोलून दाखवितात त्यांना हृदयासंबंधी विकार (उदा. छातीत दुखणे, हाय ब्लड प्रेशर) होण्याची तर जे पुरुष त्यांचा राग किंवा भावना मनात दाबून ठेवतात त्यांना अस्थी व स्नायूसंबंधी दुखणे (पाठदुखी, सांधेदुखी, स्नयू ताणने) उद्भवण्याची शक्यता अधिक असते.

आपल्या भावना आणि शारीरिक आरोग्याचा संबंध असतो असे विविध संशोधनातून समोर आलेले आहे. रागामुळे हृदयाची गती वाढते तर भावना व्यक्त न केल्यामुळे स्नायूमध्ये ताठपणा येतो, असे प्रा. क्लॉडिया हास यांनी सांगितले. या संशोधनाचे निष्कर्ष महिलांच्या तुलनेत पुरुषांसाठी अधिक लागू पडतात. परंतु शांतपणे चर्चेद्वारे वाद मिटविल्याने दोघांनाही फायदा आहे.

Web Title: Please read this before fighting a wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.