केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी 'अशी' फायदेशीर ठरते खसखस!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 11:44 AM2019-07-10T11:44:23+5:302019-07-10T11:44:56+5:30
तुम्ही खसखस हे नाव ऐकलं असेल. खसखस आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. खसखस हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते, तसेच खसखस त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते.
तुम्ही खसखस हे नाव ऐकलं असेल. खसखस आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. खसखस हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करते, तसेच खसखस त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदामध्येही खसखशीचे अनेक फायदे सांगितले आहेत. तुम्ही कधी त्वचेसाठी खसखशीचा वापर केला आहे का? आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी असलेले खसखशीचे फायदे सांगणार असून त्याचा वापर कसा करावा याबाबतही काही टिप्स देणार आहोत.
1. खसखस एक्जिमा नावाचं स्किन इन्फेक्शन ठिक करण्यासाठी मदत करते. यामध्ये लायनोलेनिक अॅसिड (linolenic acid) असतं. जे त्वचेला होणारी जळजळ आणि इतर टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.
2. आयुर्वेदामध्येही सौंदर्य वाढविण्यासाठी खसखशीचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर दह्यासोबत मध एकत्र करून लावली तर हे त्वचेसाठी अत्यंत उत्तम स्क्रब ठरतं. म्हणजेच खसखस डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करते.
3. खसखस त्वचेसाठी उत्तम मॉयश्चरायझर म्हणून काम करते. यासाठी खसखस, दूध आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांमध्येच स्किन सॉफ्ट आणि ग्लोइंग होण्यास मदत होते.
4. खसखस स्किनव्यतिरिक्त केसांसाठीही फायदेशीर ठरते. खसखशीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, मॅग्नेशियम, झिंक आणि कॅल्शियम असतात. जे स्काल्पला हेल्दी ठेवतात आणि केस सुंदर होतात. याव्यतिरिक्त खसखस डँड्रफची समस्याही दूर होते.
5. खसखस केसांच्या वाढिसाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. शॅम्पू केल्यानंतर केसांमध्ये खसखस लावल्याने केसांचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. यासाठी खसखस 1 ते 2 तासांसाठी भिजत ठेवा आणि त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. आता हे मिश्रण केसांना व्यवस्थित लावा आणि एका तासासाठी असचं ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून पुन्हा शॅम्पूच्या मदतीने धुवून घ्या.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.