चेहऱ्यावरील डागांना आहात हैराण; बटाट्याचे 'हे' 2 घरगुती फेसपॅक वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 02:31 PM2019-06-23T14:31:56+5:302019-06-23T14:36:43+5:30

अनेकांना बटाटा किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खायला आवडत नाही. प्रत्येक घरामध्ये बटाटा अगदी सहज आढळून येतो. अनेकदा भाज्यांची चव वाढविण्यासाठी बटाट्याचा वापर करण्यात येतो.

Potato face pack to remove spots from skin and get glowing white skin | चेहऱ्यावरील डागांना आहात हैराण; बटाट्याचे 'हे' 2 घरगुती फेसपॅक वापरा

चेहऱ्यावरील डागांना आहात हैराण; बटाट्याचे 'हे' 2 घरगुती फेसपॅक वापरा

googlenewsNext

अनेकांना बटाटा किंवा त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ खायला आवडत नाही. प्रत्येक घरामध्ये बटाटा अगदी सहज आढळून येतो. अनेकदा भाज्यांची चव वाढविण्यासाठी बटाट्याचा वापर करण्यात येतो. अनेक लोक बटाटा खाणं टाळतात. कारण त्यांचा असा समज असतो की, बटाटा खाल्याने वजन आणि शुगर दोन्ही वाढते. परंतु असं अजिबात नाही. बटाट्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. हे अनेक आवश्यक पोषक तत्व आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे बटाटा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो. बटाटा चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, पूरळ आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतो. 

जर बटाटा दररोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होतो आणि ग्लोदेखील वाढतो. परंतु यासाठी बटाटा चेहऱ्यावर कसा लावावा? याची योग्य पद्धत माहित असणं आवश्यक असतं. जर तुम्हाला झटपट परिणाम पाहिजे असतील तर त्यासाठी बटाट्याचे फेसपॅक फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला बटाट्याचे दोन फेसपॅक कसे तयार करावे याबाबत सांगणार आहोत. हे फेसपॅक वापरल्याने त्वचा चमकदार होण्यासोबतच त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही मदत होईल. हे फेसपॅक ऑयली आणि ड्राय स्किन दोन्हींसाठी फायदेशीर ठरतात. 

बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक 

जर तुम्हाला चेहऱ्याचा रंग उजळवायचा असेल आणि काळपटपणा दूर करायचा असेल तर त्यासाठी बटाटा, लिंबू आणि मुलतानी मातीचा फेसपॅक ट्राय करा. बटाटा आणि लिंबू यांमध्ये अशी तत्व असतात जी त्वचेची रोमछिद्र खुली करून त्यातील घाण बाहेर काढण्यासाठी मदत करतात. लिंबामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर करतं, ज्यामुळे ऑयली स्किनची समस्या दूर होते. तसेच मुलतानी मातीमधील मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात. जे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी आणि वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच हे डेड स्किन सेल्स दूर करण्यासाठीही मदत करतात. 

फेस पॅक तयार करण्याची पद्धत :

एक कच्चा बटाटा घ्या आणि त्याची साल काढून बारिक करून घ्या. त्यामध्ये 2 चमचे मुलतानी माती आणि एक लिंबू पिळून घ्या. तयार पॅक व्यवस्थित एकत्र करा आणि चेहऱ्यावर लावा. एक तासापर्यंत ठेवा आणि त्यानंतर हाताने मसाज करून थंड पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ धुवून टाका. 

सुरकुत्यांसाठी बटाटा आणि कच्च्या दूधाचा फेसपॅक 

सुरकुत्या दूर करण्यासाठी बटाटा आणि कच्चं दूधाचा मास्क फायदेशीर ठरतो. कच्चं दूध त्वचेला मॉयश्चराइज करतं. डाग आणि सुरकुत्या दूर करण्यासाठीही मदत करतं. याव्यतिरिक्त दूधाचा उपयोग त्वचेसाठी एक क्लिंजर म्हणूनही केला जातो. 

फेसपॅक तयार करण्याची पद्धत : 

फेसपॅक तयार करण्यासाठी एक कच्चा बटाटा किसून घ्या. त्यामध्ये 4 चमचे दूध आणि थोडसं गुलाबपाणी एकत्र करा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि अर्ध्या तासासाठी असचं राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने तोंड धुवून टाका. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Potato face pack to remove spots from skin and get glowing white skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.