​प्रशांत दामले यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2016 07:10 AM2016-06-26T07:10:33+5:302016-06-26T12:40:33+5:30

कार्यबाहुल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगुन मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी...

Prashant Damle's resignation | ​प्रशांत दामले यांचा राजीनामा

​प्रशांत दामले यांचा राजीनामा

Next
र्यबाहुल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगुन मराठी व्यावसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आपला विहित कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच शुक्रवारी दादरच्या शिवाजी मंदिरातील राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या निर्मात्यांच्या विशेष सभेत राजीनामा दिला. त्यांच्या सोबत त्यांच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनीदेखील राजीनामा दिला आहे. 

प्रशांत दामले यांनी निर्मात्यांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंदर्भात ‘नरो वा कुंजरोवा’ भूमिका घेतल्याने संघाचे अनेक सदस्य त्यांच्यावर नाराज झाले होते. त्यातच गेली दोन वर्षे राज्य शासनाच्या व्यावसायिक नाट्य स्पर्धेसंदर्भातजे घोळ घातले गेले त्यात निर्माता संघांचे पदाधिकारी असलेल्या दिलीप जाधव यांनी घेतलेली संशयास्पद भूमिकाही प्रामुख्याने कारणीभूत ठरल्याचे आरोप अनेक निर्मात्यांकडून त्यांच्यावर करण्यात आले होते. त्यांच्या या कारवायांच्या बाबतीतही अध्यक्ष या नात्याने प्रशांत दामले यांनी ठोस भूमिका न घेता त्यांना पाठीशी घातल्याचा निर्मात्यांचा आरोप होता.

शासनाबरोबरच्या नाट्य स्पर्धेसंबंधीच्या लढ्यात निर्माता संघाचे अध्यक्ष म्हणून दामले यांनी काहीएक भूमिका घेणे आवश्यक असताना त्यांनी ती न घेतल्याने अनेक निर्माते संतप्त झाले होते. याखेरीज नाट्य व्यवसायाशी संबंधित अनेक प्रश्नांवरही अध्यक्ष दामले यांनी जे निर्णय घेणे अपेक्षित होते ते न घेतल्याने त्यांच्या कारभारावर निर्माते रुष्ट होते. या सगळ्या घटनांची परिणती प्रशांत दामले यांच्यासह निर्माता संघाच्या सबंध कार्यकारिणीने राजीनामा देण्यात झाल्याचे समजते. आता नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून १८ जुलैपर्यंत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज पाठवावेत असे आवाहन निर्माता संघातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Prashant Damle's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.