चहा पावडरच्या मदतीने लोखंडी कढईत तयार करा खास तेल, लगेच काळे होतील पांढरे केस!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:54 PM2024-11-06T16:54:50+5:302024-11-06T17:15:28+5:30
White Hair Home Remedies: एक सोपा आणि घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायाने केस तर काळे होतीलच, सोबतच चमकदार आणि मजबूतही होतील.
White Hair Home Remedies: केस पांढरे होण्याच्या समस्येने आजकाल जास्तीत जास्त लोक वैतागलेले असतात. अशात बरेच लोक काळे करण्यासाठी नॅचरल उपाय करण्याऐवजी केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. ज्यांचे अनेक साईड इफेक्ट्सही असतात. या उत्पादनांऐवजी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय केले तर तुम्हाला केस काळे करण्यासाठी खूप फायदा मिळू शकेल. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या उपायाने केस तर काळे होतीलच, सोबतच चमकदार आणि मजबूतही होतील.
काय आहे उपाय?
चहा पावडर
मोहरीचं तेल
भृंगराज तेल
आवळा तेल
कलौंजी पावडर
लोखंडी कढई
कसं तयार कराल हे तेल?
या गोष्टींचं मिश्रण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी लोखंडी कढई घ्या आणि त्यात चहा पावडर टाका. त्यात मोहरीचं तेल टाकून गॅसवर ठेवा. हे तेल हलकं गरम झाल्यावर त्यात भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि कलौंजी पावडर टाका. या गोष्टी चांगल्या मिक्स करा आणि ८ ते १० मिनिटे गरम करा. त्यानंतर गाळून एका वाटीत हे तेल काढा. केसांना लावण्यासाठी खास तेल तयार आहे. आठवड्यातून दोनदा रात्री हे तेल केसांना लावा. सकाळी केस शाम्पूने धुवून घ्या. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.