वॅक्सिंग केल्यावर त्वचेवर सूज येते? या उपायांनी करा सूज दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 11:00 AM2018-12-25T11:00:54+5:302018-12-25T11:02:47+5:30
स्कीन वॅक्सिंग केल्यावर त्याने किती वेदना होतात हे ते करणाऱ्यांना चांगलंच माहीत आहे. वॅक्सिंग केल्यावर अनेक महिलांना त्वचेवर सूज आणि पिंपल्स येण्याची समस्याही बघायला मिळते.
स्कीन वॅक्सिंग केल्यावर त्याने किती वेदना होतात हे ते करणाऱ्यांना चांगलंच माहीत आहे. वॅक्सिंग केल्यावर अनेक महिलांना त्वचेवर सूज आणि पिंपल्स येण्याची समस्याही बघायला मिळते. तशी तर या सूजण्याने वेदना होत नाही, पण वेदना झाल्या तरी त्या समजून येत नाही. जर एक-दोन दिवसांनंतही ही सूज कमी झाली नाही तर काही घरगुती उपायांनी ही सूज दूर करता येते. चला जाणून घेऊ काही घरगुती उपाय...
खरंतर वॅक्सिंग केल्यानंतर लगेच त्वचेवर सूज येणे किंवा काही दिवसांनी येणे ही सामान्य बाब आहे. पण ही सूज जास्त दिवसांसाठी तशीच राहत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
एलोवेराची पाने
एलोवेराची पाने अशाप्रकारची सूज कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. यासाठी एलोवेराचं एक पान घेऊन त्यातून जेल काढा. हे जेल एअर टाइट डब्यात बंद करुन ठेवा. काही वेळाने या जेलने सूज आलेल्या जागेवर मालिश करा आणि रात्रभर जेल तसंच लावून ठेवा. काही दिवस हा उपाय केल्याने सजू दूर होईल.
टी ट्री ऑईल
(Image Credit : www.thebodyshop.com)
दोन किंवा तीन थेंब टी ट्री ऑईल आणि एक चमचा ऑलिव ऑईल घेऊन मिश्रित करा. हे सूज आलेल्या जागेवर लावा आणि एक मिनिट मालिश करा. हे तेलाचं मिश्रण रात्रभर तसंच राहू द्या. काही दिवस हे केल्याने फायदा दिसेल.
अॅपल विनेगर
अॅपल विनेगर नॉर्मल पाण्यात मिश्रित करा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने सूज आलेल्या जागेवर लावा. साधारण १० मिनिटे हे तसंच ठेवा. त्यानंतर काही वेळाने ती जागा पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय दिवसातून दोनदा करा.
खोबऱ्याचं तेल
वॅक्सिंगनंतर त्वचेला क्लींजरने स्वच्छ करा. नंतर त्वचा कोरडी करुन त्यावर खोबऱ्याचं तेल लावा. आंघोळ करण्याआधी रोज हा उपाय केल्याने सूज लगेच दूर होईल.