कोणत्याही प्रकारच्या त्वचेवरून काळपटपणा आणि पिंपल्स होतील दूर, पुदीन्याचा 'असा' करा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 12:12 PM2020-02-17T12:12:23+5:302020-02-17T12:12:27+5:30

पुदीना खाण्याचे अनेक फायदे असतात.

Pudina benefits for healthy beautiful skin | कोणत्याही प्रकारच्या त्वचेवरून काळपटपणा आणि पिंपल्स होतील दूर, पुदीन्याचा 'असा' करा वापर!

कोणत्याही प्रकारच्या त्वचेवरून काळपटपणा आणि पिंपल्स होतील दूर, पुदीन्याचा 'असा' करा वापर!

googlenewsNext

पुदीना खाण्याचे अनेक फायदे असतात. पुदीना शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. पण तुम्हाला माहीत आहे का पुदीना तुमच्या शरीरसह त्वचेला सुद्धा सुंदर बनवण्यासाठी फायदेशीर ठरत असतो. पुदीन्यात  ऐंटिबैक्टीरियल प्रॉपर्टीज असतात. ते आपल्या त्वचेतील बॅक्टीरीयाला सक्रिय होण्यापासून रोखत असतात. त्यामुळे त्वचेवर डागांची समस्या कमी होते. पुदीन्यात सलिसीक्लिक एसिड असतं. ते त्वचेवरील एक्ने कमी करण्यासाठी उत्तम ठरतं. व्हिटामीन ए मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हे पोर्स ऑईल फ्री आणि क्लीन ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. 

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो 

(Image credit-vargasfaceandskin)

त्वचा कोरडी होणे एक सामान्य बाब झाली आहे. ड्रायनेसपासून बचाव करण्यासाठी डाएटमध्ये पुदीन्याचा समावेश करावा. कारण यातून भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. सोबतच त्वचेवर एक चमकदारपणा येईल. पुदीन्याने केवळ त्वचेची स्वच्छताच होते असं नाही तर याच्या नियमित वापराने त्वचेचा ग्लो वाढतो. यासाठी नियमितपणे त्वचेवर पुदीन्याच्या पानांची पेस्ट लावावी.

काळपटपणा घालवण्यासाठी

(image credit- skin craft)

उन्हामुळे काळपटपणा आल्यास त्वचेवर पुदीन्याच्या ताज्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास लगेच फायदा दिसतो. तसेच उन्हाळ्यात सनबर्नची समस्याही सामान्य आहे. सनबर्न त्वचेवर मुलतानी मातीमध्ये पुदीन्याचा रस किंवा पिपरमेंट ऑइल मिश्रित करुन लावल्यास आराम मिळेल.

कोरड्या त्वचेसाठी असा तयार करा फेसपॅक

कोरडी त्वचा असलेल्या लोकांना त्वचेवर खाज येत असते. त्यासाठी पुदीना आणि मधाचा किंवा फेसपॅक  बनवून स्कीनला लावा. यासाठी पुदीन्याची १० ते १२ पानं घ्या. ही पानं मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि गुलाबजल घाला. हे मिश्रण एकत्र करून त्वचेवर लावा. हा पॅक सुकल्यानंतर चेहरा धुवून टाका. 

ऑइली त्वचेसाठी 

पुदीन्याचा फेसपॅक स्कीनसाठी खूप खास असतो. कारण पुदीन्यामध्ये व्हिटामीन ए असतं. ऑईली स्कीनमधून बाहेर येत असलेले ऑईल सिक्रेशनला कमी करतं. त्यामुळे दिर्घकाळ त्वचा चांगली राहते. ( हे पण वाचा-सुंदर त्वचेसाठी सर्वात बेस्ट आयुर्वेदिक उपाय चंदनाचं तेल, याचे फायदे वाचाल तर सर्व ब्युटी प्रॉडक्ट्स वापरणं सोडाल!)

नॉर्मल त्वचेसाठी फेसपॅक

(image credit-innertrue)

पुदीन्याची ६ ते ८ पानं घेऊन त्यांना वाटून घ्या . त्यात चंदनाची पावडर आणि गुलाबजल घाला. हे मिश्रण एकत्र करा. २० मिनिटं त्वचेला लावून नंतर चेहरा धूवून टाका. ( हे पण वाचा-डाग आणि पुळ्यांनी हैराण असाल, तर पार्लरशिवाय डॅमेज त्वचा डिटॉक्स करण्याची 'ही' ट्रिक वापरा!)

Web Title: Pudina benefits for healthy beautiful skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.