रक्षाबंधनाच्या दिवशी दिसायचंय खास?; 'या' ब्युटी टिप्स ठरतील फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 12:40 PM2019-08-13T12:40:31+5:302019-08-13T12:52:14+5:30
सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात.
सध्या श्रावण महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक सण साजरे केले जातात. असातच अवघ्या काही दिवसांवर रक्षाबंधन आलं आहे. हा दिवस म्हणजे, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा उत्सव. भावांपेक्षा बहिणी या दिवसासाठी उत्सुक असतात. या दिवसासाठी त्या अनेक दिवसांपासून तयारीही करत असतात. सर्वात आधी त्या डिसाइड करतात की, त्या कोणते आउटफिट्स वेअर करणार आहेत, आणि त्यासोबत त्या कोणता मेकअप आणि हेअरस्टाइल कॅरी करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनसाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा लूक आणखी स्टायलिश आणि सुंदर होण्यास मदत होईल.
गोल्ड शाइन
फेस्टिवलच्या निमित्ताने गोल्डन कलर सूट करतो. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या हा कलर तरूणींमध्ये ट्रेन्डमध्ये आहे. बाजारातून तुम्ही कोणताही हायलायटर घ्या आणि तो चीकबोन्सचा ब्रॉन्जिंग एरिया, नोजचे ब्रीज आणि हेयरलाइनवर लावा. हे अप्लाय करण्याआधी लक्षात ठेवा की, तुमची स्किन हायड्रेट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मेकअप बेस आणि कंन्सीलर अप्लाय करताना खास लक्ष द्या.
ब्राइट कोरल
जेव्हा रेड आणि ऑरेंज एकत्र येतात, त्यावेळी ब्राइट कोरल कलर तयार होतो. हा शेज जास्त ऑरेंज नसतो किंवा जास्त रेडही नसतो. तसेच याबाबतची खास गोष्ट म्हणजे, हा कोणत्याही स्किन टोनवर सूट होतो. या कलरची लिपस्टिक तुमच्या पाउटला आणखी सुंदर लूक देण्यासाठी मदत करते. ग्लॉसीऐवजी मॅट किंवा सेमी ग्लॉसी कोरल फिनिश लिपस्टिक घ्या. कारण सध्या हे ट्रेन्डिंगमध्ये आहेत.
शिमर आणि ग्लिमरवरही द्या जोर
जर रक्षआबंधनासाठी तुम्हाला सर्वांपेक्षा वेगळा आणि अट्रॅक्टिव्ह लूक करण्याची इच्छा असेल तर, त्यासाठी शिमर आणि ग्लिमर मेकअप निवडा. हा लूक मिळवण्यासाठी अशा फाउंडेशन आणि ब्लशरचा वापर करा, ज्यामध्ये ग्लिटर आहे. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की, ग्लिटरचा वापर तेवढाच करा जेवढा तुमच्या चेहऱ्याला सूट करेल. सध्या ब्लॅक मेटल, पिंक कोरल, ब्रॉन्ज, स्टील मेटल, गोल्ड डल, यलो कॉपर आणि सिल्वर यांसारख्या कलर्सची मागणी आहे.
कलरफुल आय मेकअप
वन शेड ऐवजी तुम्ही कलरफुल आय मेकअप ट्राय करू शकता. याचा सर्वात जास्त फायदा म्हणजे, हा डोळे आणखी अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी मदत करतो. तसेच तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅचिंग असणारं कॉम्बिनेशनही ट्राय करू शकता.
कर्ल्स आहे ट्रेन्डमध्ये
एक वेळ होती जेव्हा स्ट्रेट हेअर ट्रेन्डमध्ये होते. पण आता सध्या कर्ल्सचा ट्रेन्ड जोमात आहे. थोडेसे कर्ली केस आता तरूणींची आवड बनत चालले आहेत. ही स्टाइल तुम्ही घरीच स्ट्रेटनिंग किंवा कर्ल्स करून हेअर स्टाइल करू शकता.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.