Raksha Bandhan 2018: बाजारात जाऊन मेहंदी लावत असाल तर सावधान, असं पडू शकतं महागात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:57 PM2018-08-24T12:57:04+5:302018-08-24T13:00:07+5:30
Raksha Bandhan Special : मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून मेहंदी काढून घेण्यासाठीही प्लॅनिंग केलं जात आहे. पण तुम्हीही बाहेर जाऊन मेहंदी काढण्याचं प्लॅनिंग करत असाल तर सावध व्हा.
सध्या रक्षाबंधनाची रेलचेल सगळीकडेच बघायला मिळत आहे. महिलांची खरेदी जोरदार सुरु आहे. अशातच सर्वात जास्त क्रेझ बघायला मिळते ती मेहंदीची. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांहून मेहंदी काढून घेण्यासाठीही प्लॅनिंग केलं जात आहे. पण तुम्हीही बाहेर जाऊन मेहंदी काढण्याचं प्लॅनिंग करत असाल तर सावध व्हा.
कारण मॉलमध्ये किंवा बाहेर कुठेही जाऊन मेहंदी काढून घेतात. पण बाहेर जाऊन अशाप्रकारे मेहंदी काढणे त्वचेसाठी घातक ठरु शकतं. कारण बाजारात मिळणाऱ्या मेहंदीमध्ये वेगवेगळी रसायने मिश्रित केलेली असतात. जे मेहंदीचा रंग डार्क करतात. पण या रसायनांमुळे तुमच्या त्वचेला धोका होऊ शकतो.
कोणते रसायन असतात?
बाजारात लावल्या जाणाऱ्या मेहंदीमध्ये पीपीडी आणि डायमीन नावाचे रसायन असतात जे त्वचेसाठी हानिकारक असतात. हे रसायन मेहंदीचा रंग डार्क करण्यासाठी वापरले जातात.या घातक रसायनामुळे त्वचेवर खाज येणे, जळजळ येणे आणि सूज येणे अशा समस्या होतात.
होऊ शकतो कॅन्सर
जेव्हा ही रसायन मिश्रित मेहंदी सूर्य किरणांच्या संपर्कात येते तेव्हा त्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. यात यात केवळ पीपीडीच नाही तर अमोनिया, आक्सीडेटिन, हायड्रोजनसारखे आणखीही काही घातक रसायन मिश्रित असतात. जे त्वचेसाठी फार हानिकारक ठरतात. मेहंदीमध्ये तयार होणारं पीएच अॅसिड सर्वात घातक असतं.
हर्बल मेहंदी सर्वात चांगली
गेल्याकाही काळापासून बाजारात मिळणाऱ्या मेहंदीला ओळखणं कठिण असतं. त्यामुळे प्रयत्न करा की, मेहंदीच्या पानांपासून तयार करण्यात आलेली मेहंदीच वापरा. हर्बल मेहंदी केवळ हाताची सुंदरताच वाढवत नाही तर त्वचेला थंडही करते. ही मेहंदी केसांना लावणेही फायदेशीर ठरते.
ही घ्या काळजी
हे ध्यानात ठेवा की, मेहंदी लावल्यानंतर तुमच्या शरीराच्या भागांवर काही इजा झाली किंवा आणखीही काही झालं तर हात लगेच थंड पाण्याने धुवा. त्यानंतर खोबऱ्याचा लेप त्यावर लावा आणि शरीराच्या त्या भागाची चांगल्याप्रकारे मालिश करा.
काय म्हणतात तज्ज्ञ?
डॉक्टरांनुसार, मेहंदी लावताना हे कळत नाही की, ती तुम्हाला किती नुकसान पोहोचवत आहे. पण याने होणाऱ्या नुकसानाबाबत तुम्हाला काही वेळाने कळेल. याने तुम्हाला कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो.