Rakshabandhan special : 'या' खास दिवशी तयार होण्यासाठी वापरा ब्युटी टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 02:58 PM2018-08-24T14:58:26+5:302018-08-24T15:00:46+5:30

Rakshabandhan special : रक्षाबंधन म्हटलं की नटनथटणं आलंचं. या दिवशी मुली आपले आउटफिट्स आणि ज्वेलरीचा फार गांभिर्याने विचार करतात.

Rakshabandhan special : beauty tricks for look beautiful in rakshabandhan | Rakshabandhan special : 'या' खास दिवशी तयार होण्यासाठी वापरा ब्युटी टिप्स!

Rakshabandhan special : 'या' खास दिवशी तयार होण्यासाठी वापरा ब्युटी टिप्स!

Next

रक्षाबंधन म्हटलं की नटनथटणं आलंचं. या दिवशी मुली आपले आउटफिट्स आणि ज्वेलरीचा फार गांभिर्याने विचार करतात. तसेच आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी पार्लरमध्ये जावून फेशिअल आणि इतर अन्य ट्रिटमेंट्सचाही आधार घेतात. अशातच आउटफिट्स आणि मेकअप परफेक्ट असणंही तितकचं गरजेचं आहे. जाणून घेऊयात रक्षाबंधनच्या खास दिवशी तयार होण्यासाठी काही ब्युटी ट्रिक्स. ज्यामुळे तुमचं सौंदर्य वाढण्यास मदत होईल.

1. आयब्रो शेपमध्ये असाव्यात

परफेक्ट लूक मिळवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यानुसार तुमच्या आयब्रो असणं गरजेचं आहे. परफेक्ट शेपमध्ये असलेल्या ऑयब्रो डोळ्यांसोबतच चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठीही फायदेशीर ठरतात. 

2. चेहऱ्यावरील डार्क स्पॉट्सना बाय करा

अनेकदा चेहऱ्यावर पिम्पल्समुळे डार्क स्पॉट्स तयार होतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य बिघडतं. पण योग्य मेकअप टिप्स फॉलो केल्या तर हे डाग तुम्ही लपवू शकता. त्यासाठी मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर कन्सिलरचा वापर करा. तसेच या दिवशी थोडा डार्क मेकअप करा. याशिवाय जर तुम्हाला ब्लशरचा वापर करायचा असेल तर नीट ब्लेंड करून लावा. 

3. लायनर नीट लावा

आयलायनर लावताना आपल्या डोळ्यांचा आकार लक्षात घ्या. जर तुमचे डोळे छोटे असतील तर तुम्ही विंग्ड आयलायनर लावा. यामुळे डोळे मोठे दिसण्यास मदत होईल. याशिवाय मस्कराही लावू शकता. 

4. फ्रूट मास्क

चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी तुम्ही फ्रुट मास्क वापरू शकता. फ्रुट मास्क तयार करण्यासाठी केळं, सफरचंद, पपई आणि संत्र्याचा गर एकत्र करून चेहऱ्यावर लावा. साधारणतः अर्ध्या तासापर्यंत ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरच्या मृत पेशी निघून जातील आणि इंस्टंट ग्लो मिळेल. 

5. लिपस्टिक

या खास दिवशी ओठांचं सौंदर्य वाढविण्यासाठी लिपस्टिकचा वापर करा. यासाठी लाइट पिंक, लाइट ऑरेंज, पिच आणि लाइट ब्राउन शेड्सचा वापर करा. लिपस्टिकचा रंग फार डार्क किंवा चमकदार असू नये. ओठांवर लिपस्टिक लावताना ब्रशचा वपर करा. 

6. हेयरस्टाइल

जर तुम्ही ट्रेडिशनल ड्रेस घालणार असाल तर हेअर स्टाइल करताना त्यामध्ये फॅन्सी आणि ट्रेन्डी हेअर पिन नक्की लावा. जर तुमचे केस कुरळे किंवा बाउन्सी असतील तर ते बांधू नका. मोकळे केस ठेवले तर जास्त चांगला लूक मिळेल. बॉबी पिनच्या मदतीने पुढे केसांना बांधा आणि मागील बाजूस मोकळे सोडा. 

Web Title: Rakshabandhan special : beauty tricks for look beautiful in rakshabandhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.