पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2016 12:42 PM2016-06-01T12:42:58+5:302016-06-01T18:12:58+5:30

पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात? येत्या दोन ते तीन आठवड्यात मान्सून महाराष्टÑात धडक मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. वातावरणात बदल होत असताना तुम्ही त्यानुसार स्वत:ला तयार करणं आवश्यक असतं. तुम्ही पावसाळ्याला सामोरं जाण्यास तयार आहात का, मान्सूनपूर्व तुम्ही काय काळजी घ्याल हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या मोसमात तुमच्या त्वचेची, केसांची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कावीळ, खोकला, हगवण, विषमज्वर अशा रोगांनी आजारी पडण्याचे प्रमाण या काळात वाढते. म्हणून तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल.

Ready to face the monsoon? | पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात?

पावसाळ्याला सामोरे जाण्यास तयार आहात?

Next
त्या दोन ते तीन आठवड्यात मान्सून महाराष्टÑात धडक मारणार अशी चिन्हं दिसत आहेत. वातावरणात बदल होत असताना तुम्ही त्यानुसार स्वत:ला तयार करणं आवश्यक असतं. तुम्ही पावसाळ्याला सामोरं जाण्यास तयार आहात का, मान्सूनपूर्व तुम्ही काय काळजी घ्याल हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. या मोसमात तुमच्या त्वचेची, केसांची, आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. कावीळ, खोकला, हगवण, विषमज्वर अशा रोगांनी आजारी पडण्याचे प्रमाण या काळात वाढते. म्हणून तुम्हाला काळजी घ्यावीच लागेल.
फिल्मस्टार काय करतात?
आरोग्याच्याबाबतीत पावसाळा इतका धोकादायक ऋतू असतानाही चित्रपटात मात्र नायक-नायिका अगदी बिनधास्त कसे भिजत असतात, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. परंतु ते सर्वसामान्यांसारखे कुठल्याही काळजीशिवाय पावसाला सामोरे जात नाहीत. एक तर ज्या पावसात ते भिजतात तो पाऊस बहुतेकदा कृत्रिमच असतो. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. दुसरे म्हणजे शॉट ओके झाला की लगेच ते पाण्याबाहेर येऊन केस कोरडे करतात. त्यांना भिजण्याचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून हेल्थ एक्सपर्टची टीम त्यांच्या सोबतीला असते. 
अशी घ्या काळजी...
पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून तुमचा आहार योग्य असणे आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही भरपूर पाणी पिणं ही तितकेच गरजेचे आहे. उष्णतेमुळे आलेल्या घामोळ्या, इसब असे त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात तुमचे केस चांगले असणे आवश्यक आहे. तुमचे केस अधिक काळ ओलसर राहिले तर त्याचा त्रास होतो. ओल्या केसांमुळे दुर्गंधी येते. 
त्वचेकडे द्या विशेष लक्ष
पावसाळ्यात धुलीकण तुमच्या शरीरावर बसण्याची शक्यता असते. यामुळे तुमची असणारी साधारण त्वचा आणि त्याची स्थिती यावर परिणाम होतो. यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचा, शरीर स्वच्छ करणारा साबण वापरा. त्याशिवाय त्वचा चांगल्या पद्धतीने घासून घ्या. अल्कोहोल फ्री टोनरचा वापर करा. शरीरातील बंद झालेली छिद्रे खुली करण्यासाठी याचा फायदा होतो. हवामानात बदल होत असल्याने सनस्क्रीन वापरणे बंद करा. पावसाळ्यात मेकअपचा उपयोग होत नाही. त्यामुळे आतापासूनच मेकअप विषयी आपण सावध राहिले पाहिजे. ब्लिचिंग, फेशियल या काळात टाळणे आवश्यक आहे. रात्री ओठ धुतले पाहिजेत. त्याशिवाय पावसाळ्यात डार्क शेडच्या लिपस्टिक उपयोगी नसतात. 
केस सतत भिजायला नकोत
आपण पावसाळ्यात केस भिजू नये म्हणून काळजी घेत असतो. मात्र अचानक आलेल्या पावसानंतर आपले केस भिजतात. त्यामुळे आपल्याकडे माईल्ड शाम्पू असणे आवश्यक आहे. ज्यायोगे तुम्ही केस धुवू शकता. कंडिशनरचा वापर करणेही चांगले आहे. रात्रीच्यावेळी गरम तेलाने डोक्याला मसाज करा, त्यानंतर केस विंचरणे आवश्यक आहे. डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. केसांना रंग देण्याची कल्पना चांगली नाही. या काळात केस नैसर्गिकरित्या राहू द्यावेत. हेअर ड्रायरचा वापर करण्याची गरज असल्याने तोही आपल्याकडे असावा. केस पुसण्यासाठी कोरड्या टॉवेलचा वापर करावा. 
<आहाराच्याबाबतीत सतर्क राहा
पावसाळ्यात आजारी पडू नये म्हणून आधीपासूनच काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आपला आहार योग्य असणे गरजेचे आहे. अन्यथा संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या शरीरातील पाणी कमी होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व फळे, भाजीपाला विशेषत: हिरव्या पालेभाज्या, कोबी हे धुवून घेतले पाहिजे. भाज्यांमध्ये अळ्या, किडे यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. न शिजविलेली फळे, सलाद टाळावेत. अस्थमा, दमा किंवा मधुमेह असणाºयांनी पावसाळ्यापूर्वी अधिक काळजी घ्यावी. जेणेकरुन पावसाळ्यात त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. पावसाळ्यात अनवाणी चालू नये किंवा ओले बूट घालू नयेत. 
विशेषत: डायबेटिस असणाºया रुग्णांनी याची पूर्वीच काळजी घ्यावी. सहसा दिवसा झोपू नये, त्याशिवाय अतिव्यायाम हा टाळावा. 

Web Title: Ready to face the monsoon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.