कमी वयातच केस होत आहेत पांढरे? 'ही' कारणं तर नाहीत ना...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 07:34 PM2019-05-07T19:34:58+5:302019-05-07T19:35:45+5:30
आपल्यापैकी अनेकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. मग वय काहीही असो लहानांपासून अगदी थोरामोठ्यांना या समस्येने अगदी हैराण केलं आहे.
आपल्यापैकी अनेकजण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. मग वय काहीही असो लहानांपासून अगदी थोरामोठ्यांना या समस्येने अगदी हैराण केलं आहे. कमी वयात केस पांढरे होण्याचं कारम अनेकदा जेनेटिक समजलं जातं. परंतु केस पांढरे होण्यामागे इतरही अनेक कारणं आहेत. जाणून घेऊया कमी वयात केस पांढरे होण्याच्या काही कारणांबाबत...
1. प्रदूषण
वायू प्रदूषणामुळेही केसांना फार नुकसान पोहोचतं. हवेमध्ये अस्तित्वात असणारी प्रदूषित तत्व केसांना डॅमेज करण्यासोबतच केस पांढरेही होतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, प्रदूषित हवेमध्ये असणारे फ्री रॅडिकल्स मेलानिन डॅमेज करून केस पांढरे करण्याचं काम करतात.
2. तणाव
कमी वयातच केस पांढरे होण्याचं एक कारण तणावही आहे, तणाव घेतल्याने केस फार लवकर आपला नैसर्गिक रंग गमावतात. तुम्ही जर तुमच्या केसांचा रंग पांढरा होण्यापासून रोखण्याचा विचार करत असाल तर तणावापासून दूर रहा.
3. धुम्रपान
धुम्रपान हेदेखील कमी वयात केस पांढरे होण्याचं एक कारण आहे. 2013मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनामधून, ज्या व्यक्ती धुम्रपान करतात त्यांचे केस पांढरे होण्याची शक्यता इतरांच्या तुलनेत 25 टक्क्यांनी वाढते. याव्यतिरिक्त धुम्रपान करण्याची सवय शरीरासाठीही हानिकारक असते.
4. हार्मोन्स
शरीरामध्ये हार्मोन्सचा स्तर बिघडल्यामुळे केस लवकर पांडरे होतात. हार्मन्स असंतुलित होत असल्यामुळे केस कोरडे होतात. केसांची चमक नाहीशी होते. तसेच केस गळण्याची समस्या वाढते.
5. अनहेल्दी डाएट
डाएटचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे डाएटबाबत खास काळजी घेणं गरजेचं आहे. डाएटमध्ये न्यूट्रिएंट्सती कमतरता असल्यामुळे कमी वयातच केस पांढरे होतात. तसेच शरीरामध्ये व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळेही केस कोरडे आणि निस्तेज होतात. तसेच ते आपला नैसर्गिक रंग गमावतात.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.