हाय ब्लड प्रेशरवर ‘चेरी ज्यूस’चा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2016 03:28 PM2016-05-07T15:28:45+5:302016-05-07T20:58:45+5:30

चेरीचा ज्यूस पिल्यामुळ उच्च रक्तदाबामध्ये मोठ्य प्रमाणात घट होते.

The remedy for 'Cherry Juice' on high blood pressure | हाय ब्लड प्रेशरवर ‘चेरी ज्यूस’चा उपाय

हाय ब्लड प्रेशरवर ‘चेरी ज्यूस’चा उपाय

Next
च्या धकाधकीच्या जीवनात गंभीर आजारांचे प्रमाण खूप वाढले आहेत. हाय ब्लड प्रेशर अशाच आजारांपैकी एक उदाहरण आहे. परंतु यावर एक फार सोपा उपाय संशोधकांना सापडला आहे.

नव्या रिसर्चमधून असे दिसून आले की, चेरीचा ज्यूस पिल्यामुळ उच्च रक्तदाबामध्ये मोठ्य प्रमाणात घट होते. मेडिशन केल्यामुळे जो परिणाम होतो तेवढेच प्रभावी चेरी ज्यूस असते.

चेरीमध्येसुद्धा ‘मॉन्टमोरेन्सी’ प्रजातीच्या चेरीचा ज्यूस पिणे अधिक गुणकारी असते. मॉन्टमोरेन्सी चेरीच ज्यूस पिल्यावर केवळ तीनच तासांत पारा सात मिलिमिटर खाली उतरतो. पुरुषांसाठी तर चेरी ज्यूस वरदान आहे. कारण ते अँटी-हायपरटेन्सिव्ह औषधाइतकेच परिणामकारक असते.

इंग्लंडच्या नॉर्थ्रुम्ब्रिया विद्यापीठातील संशोधक केरेन कीन यांनी माहिती दिली की, ब्लड प्रेशर कमी करण्याची चेरी ज्यूसची अद्भूत क्षमता खरोखरंच आश्चर्यकारक आहे. पुरुषांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी मॉन्टमोरेन्सी चेरी ज्यूसचा वापर करणे खूप फायदेशीर ठरू शकते.

हृदयविकारांमुळे मृत्यू होण्यामागे हायब्लड प्रेशर प्रमुख कारण आहे. त्यामध्ये थोडी देखील घट आपण आणू शकलो तर अशा प्रकारे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

Web Title: The remedy for 'Cherry Juice' on high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.