ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि दालचिनीचा 'असा' करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 11:09 IST2019-11-14T11:03:28+5:302019-11-14T11:09:32+5:30
हिवाळा सुरू झाला की, स्किन ड्राय होणं ही एक सामान्य बाब आहे. ड्राय होण्यासोबतच स्किन वेगवेगळ्या जागांवरून उलते सुद्धा आणि याने वेदनाही होतात.

ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि दालचिनीचा 'असा' करा वापर!
(Image Credit : readersdigest.ca)
हिवाळा सुरू झाला की, स्किन ड्राय होणं ही एक सामान्य बाब आहे. ड्राय होण्यासोबतच स्किन वेगवेगळ्या जागांवरून उलते सुद्धा आणि याने वेदनाही होतात. त्यामुळे या दिवसात स्किनची विशेष काळजी घ्यावी लागते.
(Image Credit : businessinsider.in)
स्किनची ड्रायनेस कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक खास फेस पॅक सांगत आहोत. हा फेस पॅक खासकरून ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठीच आहे. महत्वाची बाब म्हणजे याचे कोणते साइड इफेक्टही नाहीत. हा फेस पॅक आहे तांदळाचं पीठ आणि दालचिनीचा.
तांदळाचे स्किनला होणारे फायदे
तांदळाचं पीठ हे स्किनसाठी एक टोनर म्हणून काम करतं आणि ब्लड सर्कुलेशन होण्यासही मदत करतं. तसेच याने स्किन चमकदारही होते. यात अनेक मिनरल्स असतात, जे तुमचं सौंदर्य खुलवण्यास मदत करतात. यात फेरूलिक अॅसिड आणि ऐलनटोनिन असतं, ज्याने तांदळाचं पीठ हे सनस्क्रीनसारखं काम करतं. तसेच तांदळाच्या पिठाने डार्क सर्कलही दूर होतात आणि स्किन लाइट होते.
दालचिनीची फायदे
दालचिनीमधे पॉलिफिनलॉल्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे स्किनमधील फ्री रॅडिकल्स बाहेर काढतात. तसेच यातील अॅंटी-फंगल आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्व स्किनवरील डागही दूर करतात.
कसा कराल फेस पॅक तयार?
एका वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि त्यात २ चमचे दालचिनी पावडर टाका. तसेच एका अंड्याचा पांढरा भाग आणि ३ ते ४ थेंब ग्लिसरिन टाका. या सर्वांचं चांगलं मिश्रण तयार करा. नंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि थोड्या वेळाने हलक्या हाताने मसाज करा. ५ ते १० मिनिटे मसाज केल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर काहीच लावू नका.