तांदळाच्या पाण्याने दूर करा केसांच्या 'या' 4 समस्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 01:57 PM2019-02-18T13:57:16+5:302019-02-18T14:00:16+5:30
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये भाताचा प्रामुख्याने सामावेश करण्यात येतो. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची शेतीही तयार करण्यात येते. एवढचं नाही तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी तांदळाचे अनेक फायदेही सांगितले जातात.
भारतीय खाद्यपदार्थांमध्ये किंवा आहारामध्ये भाताचा प्रामुख्याने सामावेश करण्यात येतो. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाची शेतीही तयार करण्यात येते. एवढचं नाही तर आरोग्य उत्तम राखण्यासाठी तांदळाचे अनेक फायदेही सांगितले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का? भात फक्त आरोग्यासाठीच नाही तर सौंदर्यासाठीही फायदेशीर ठरतो. तांदूळ शिजवल्यानंतर किंवा धुतल्यानंतर तांदळाचं जे पाणी शिल्लक राहतं ते काही लोक फेकून देतात. पण हेच पाणी चेहऱ्यासोबतच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही या पाण्याचा उपयोग करण्यात येतो.
आपलं सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. केसांचं सौंदर्य आणि आरोग्य राखण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. पण त्याचा फायदाच होत नाही. अशातच तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. आता तुम्ही म्हणाल की, तांदळाच्या पाण्यामध्ये असं काय असतं ज्यामुळे केस मुलायम, दाट होण्यास मदत होते? खरं तर तांदळाच्या पाण्यामध्ये स्टार्च आणि केसांसाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. ही तत्व केस चमकदार करण्यासाठी, त्यांच्या मजबूतीसाठी आणि त्यांच्या वाढिसाठी फायदेशीर ठरतात. जाणून घेऊयाच नेमका तांदळाचं पाणी केसांसाठी कसं फायदेशीर ठरतं त्याबाबत....
केस तुटणं होइल बंद
जर तुमचे केस मोठ्या प्रमाणावर गळत असतील तर आपल्या केसांना तांदळाच्या पाण्याने मसाज करा. त्यामुळे केसांची मूळं हेल्दी होण्यास मदत होते. अनेकदा केस फार कमजोर होतात, परिणामी केस गळण्याचं प्रमाण वाढतं. शरीरातील अमिनो अॅसिड, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सच्या कमतरतेमुळे असं होतं. अशातच केसांना जास्त पोषण देण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये काही एसेन्शिअल ऑइल एकत्र करू शकता.
कोरडे आणि अनहेल्दी केस
अनेकदा सतत बाहेर राहिल्यामुळे धूळ, माती किंवा केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केस कोरडे आणि अनहेल्दी होतात. त्यामुळे ते निस्तेज दिसू लागतात. तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल तर शॅम्पू केल्यानंतर तांदळाच्या पाण्याने हलक्या हाताने स्काल्पला मसाज करा. पाच मिनिटांसाठी हे असंच ठेवून नंतर साध्या पाण्याने केस धुवून टाका.
केसांमधील कोंडा दूर करा
जर तुम्ही केसांमधील कोंड्यामुळे त्रस्त असाल तर तांदळाचं पाणी या समस्येपासून सुटका करण्यासाठी मदत करेल. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी तांदळाच्या पाण्यामध्ये थोडी शिकेखाई एकत्र करा. काही वेळ तसंचं ठेवल्याने स्वच्छ पाण्याने केस धुवून टाका. जर केसांमध्ये सतत खाज येत असेल तर छोटा कांदा नारळाच्या तेलासोबत उकळून केसांना लावा. नंतर केसांना बेसन आणि तांदळाच्या पाण्याने धुवून टाका.
केस मुलायम करण्यासाठी
शॅम्पू केस स्वच्छ करण्यासाठी आणि सिल्की सॉफ्ट करण्यासाठी वापरण्यात येतो. परंतु हानिकारक केमिकल्समुळे याचा वापर करणं केसांसाठी हानिकारक ठरतं. पण तुम्हाला माहीत आहे का? तांदळाचं पाणी एक उत्तम शॅम्पूही आहे. यामध्ये आवळ्याची पावजर, शिकेखाई किंवा संत्र्याच्या सालींची पावडर एकत्र करून त्याने केस धुवा. त्यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते.