केसांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:46 AM2019-05-04T11:46:24+5:302019-05-04T11:52:04+5:30
सामान्यपणे लोक पांढरे केस लपवण्यासाठी केसांना मेहंदी लावतात. पण मेहंदी केवळ केसांचा रंग बदलण्याचं काम करत नाही.
(Image Credit : boldsky.com)
सामान्यपणे लोक पांढरे केस लपवण्यासाठी केसांना मेहंदी लावतात. पण मेहंदी केवळ केसांचा रंग बदलण्याचं काम करत नाही. मेहंदी एक औषधी आहे, ज्याने डॅड्रफ आणि केसगळतीची समस्याही दूर होते. सोबतच डोक्याची उष्णताही दूर होते.
जर तुमच्या केसांमध्ये डॅंड्रफ असे आणि तुम्ही ते दूर करण्यासाठी अनेकप्रकारचे उपाय करून थकले असाल तर मेहंदी वापरायला हवी. मेहंदीने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. मेहंदीमध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्याने इन्फेक्शनपासूनही बचाव होतो.
(Image Credit : Femina.in)
अनेकजण मेहंदी लावतात पण अनेकांना मेहंदी लावण्याची योग्य पद्धत माहीत नसते. मेहंदी लावताना त्याच्या अधिक फायद्यासाठी त्यात प्रोटीन किंवा व्हिटॅमिन ई युक्त गोष्टींचा समावेश करून लावावी. केवळ मेहंदी लावल्याने केस रखरखीत होण्याची शक्यता असते.
(Image Credit : shajgoj.co)
१) दोन चमचे मेहंदी पावडरमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक चमचा अंड्याचा पांढरा भाग मिश्रित करा. हे मिश्रण केसांना लावा आणि जेव्हा हे सुकेल तेव्हा केस कोमट पाण्याने स्वच्छ करा. याने केस रखरखी होणार नाहीत आणि केसांना पोषण मिळेल.
२) तुम्हाला हवं असेल तर मेहंदी पावडरमध्ये लिंबाचा रस आणि दही मिश्रित करूनही तुम्ही लावू शकता. एकीकडे मेहंदी केसांना रंग देण्याचं काम करेल तर दह्यामुळे केस मुलायम होतील.
३) मेहंदी पावडरमध्ये चहा पावडर मिश्रित करून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी मेहंदीचा रंग अधिक गर्द होईल. केसांना मेहंदी लावण्यापूर्वी तेल नक्की लावा.