नाकातील केसांमुळे लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो? करा हे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 10:29 AM2018-06-22T10:29:45+5:302018-06-22T10:29:45+5:30
हे केस दिसायलाही जरा विचित्र वाटतं आणि त्यांच्यामुळे होणारी नाकाची वळवळही कंटाळवाणी असते.
(Image Credit : stubblepatrol.com)
नाकातील केस नाकाच्या मार्गे शरीरात जाणारी धुळ आणि घाण रोखतात. पण नाकातील हे केस अधिक वाढल्याने अनेकांना लाजिरवाण्या क्षणांचा सामना करावा लागतो. हे केस दिसायलाही जरा विचित्र वाटतं आणि त्यांच्यामुळे होणारी नाकाची वळवळही कंटाळवाणी असते. त्यामुळे अनेकजण वेगवेगळे उपाय शोधत असतात. पण तरीही काही फायदा होतांना दिसत नाही. अशात काही खास उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
नाकातील केसांची वळवळ
तसे तर नाकातील केस आपल्या चांगल्या आरोग्यासाठी फारच फायद्याचे असतात. हे केस हवेतील धुळ, घाणे फुफ्फुसांमध्ये जाण्यापासून रोखतात. पण जेव्हा हे केस वाढतात तेव्हा ते नाकापुड्यांमधून बाहेर यायला लागतात. हे दिसायला फारच घाणेरडं वाटतं. सोबतच चार लोकांमध्ये लाजिरवाण्या क्षणांचाही सामना करावा लागतो. पुरुषांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो.
ट्रिमर किंवा कात्री
बाजारात अनेकप्रकारचे ट्रिमर उपलब्ध आहे ज्यांच्या माध्यमातून नाकातील केस काढण्यास मदत होते. यांच्या माध्यमातून तुम्ही सहज नाकातील केस काढू शकता किंवा ट्रिम करु शकता. त्यासोबतच नाकातून बाहेर आलेले केस छोट्या कात्रीच्या माध्यमातूनही कापू शकता.
वॅक्सिंग किंवा नोज क्रिम
अनेक स्पा किंवा मेन्स पार्लरमध्ये अलिकडे नोज वॅक्सिंग केली जाते. यासाठी काही एक्सपर्ट नेमलेले असतात. त्यासोबतच हेअर रिमूव्हल क्रिमचाही वापर केला जातो.
इलेक्ट्रिक शेवर अटॅचमेंट
अलिकडे बाजारात नाकातील केस ट्रिम करण्यासाठी इलेक्ट्रिक शेवर अटॅचमेंट बाजारात मिळत आहेत. या उपकरणाच्या माध्यमातून पुरुष शेव्हिंग, नाकातील केस साफ करु शकतात.
लेजर ट्रिटमेंट
लेजरच्या माध्यमातून नाकातील अतिरिक्त केस नेहमीसाठी काढता येतात. पण हे केवळ एखाद्या एक्सपर्टच्या सल्ल्यानेच करायला हवे.