रुपवती वधू बना!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2016 06:08 PM2016-11-10T18:08:22+5:302016-11-10T18:08:22+5:30
रुपवती वधू बना! दिवाळी संपली की सुरू होतो तो लग्नकार्याचा मुहूर्त. अशावेळी वधू सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाताना दिसतात. त्वचेवरील चकाकी, चमकणारे केस, रंगीबेरंगी नखे अगदी महिलांसाठी हा सर्वात मोठा दिवस असतो. वधूंनी याप्रसंगी काय केले पाहिजे, याबाबत सांगताहेत आंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-माखिजा.
Next
द वाळी संपली की सुरू होतो तो लग्नकार्याचा मुहूर्त. अशावेळी वधू सुंदर दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाताना दिसतात. त्वचेवरील चकाकी, चमकणारे केस, रंगीबेरंगी नखे अगदी महिलांसाठी हा सर्वात मोठा दिवस असतो. वधूंनी याप्रसंगी काय केले पाहिजे, याबाबत सांगताहेत आंतरराष्टÑीय ब्युटीशियन आणि हेअर कन्सलटंट सुनीता मोटवानी-माखिजा.
सुंदर त्वचा!
प्रमुख दिवसाअगोदर आपली त्वचा ही तेजस्वी दिसली पाहिजे, म्हणून अगोदरपासूनच तयारी केली जाते. ८ ते १२ आठवड्यापासून याकडे लक्ष देण्यास प्रारंभ होतो. यामध्ये चेहºयावरील व्रण, निस्तेज त्वचा आणि तारुण्यपिटीका यांच्यावर किमान २३ आठवड्यांपूर्वीपासूनच काळजी घेण्याची गरज आहे. दररोज घरगुती स्वरुपात घेण्यात येणारी काळजी आणि व्यावसायिक ट्रीटमेंट याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दोन दिवसाआड क्लिंझिंग, मॉयश्चरायझिंग, टोनिंग आणि एक्सफॉलिएटिंग हे गरजेचे आहे. वधूच्या फेशियलमध्ये फ्रेंच फेशियल, मायक्रोडर्मब्रेझिंग आणि व्हायटनिंग फेशियल हे लोकप्रिय आहेत. तुम्हाला जर त्वचेविषयी आजार असतील तर पिग्मेंटेशन आणि असीन ट्रीटमेंट तुमच्या यादीत सर्वोच्च स्थानावर असणे गरजेचे आहे.
चकाकणाºया शरीरासाठी स्पा ट्रीटमेंट
प्रमुख दिवसाअगोदर आठवड्यापूर्वी तुम्ही स्वत:ला उत्साही आणि सकारात्मक बनविण्यासाठी स्पा ट्रीटमेंट सर्वात योग्य. यासाठी तुम्ही मीठ आणि साखर यांना एकत्र करुन घरीच यावर प्रयोग करु शकता. लॅव्हेंडरसारखे सुगंधी तेल तुम्ही वापरुन लग्नापूर्वी स्वत:ला रिलॅक्स करु शकता. हॉट स्टोन मसाजमुळेही तुमचे शरीर आणि मन रिलॅक्स होऊ शकते. कोकोआ आणि चॉकलेट बॉडी रॅपचाही त्वचेसाठी वापर होऊ शकतो.
चकाकणारे केस
तुमचे केस चमकदार बनण्यासाठी चार आठवड्यापूर्वी हेअर स्पा ट्रीटमेंटची आवश्यकता असते. तुमच्या केसांना स्टायलिश लूक देण्यासाठी गुड ट्रीमचा वापर गरजेचा आहे. परमनंट ब्लाऊड्री किंवा केरॅटिन ट्रीटमेंट ही सध्या सर्वात लोकप्रिय समजली जाते. यामुळे तुमचे केस लग्नापूर्वी खूप आकर्षक दिसतात.
ट्रेंडी नेल्स
सध्या अॅक्रॅलिक नेल्स उपलब्ध असले तरी अगदी स्वस्तामधील नखे आणि पॉलिश वापरली जाण्याची भीती वधूंना असू शकते. तुम्ही अगदी अचूक पद्धतीची नखे दोन आठवड्यापूर्वी घेऊ शकता. तुमच्या हातांना आणि पायांना सवय होण्यासाठी चार आठवड्यांपूर्वी ही गोष्ट केली तर अधिक चांगले.
काही महत्त्वाच्या टिप्स...
तुम्हाला जर त्वचेची समस्या असेल तर सुमारे तीन महिन्यांपूर्वी यशस्वी उपचार करुन घेणे आवश्यक आहे.
मेकअप आणि हेअर ट्रायल एका महिन्यापूर्वीच करावी. ऐन मोक्याच्या क्षणी होणारी अडचण पाहता, ते पूर्वीच केले तर अधिक चांगले होऊ शकते.
चांगली झोप आणि योग्य आहाराचा वापर करणे आवश्यक आहे.
या काळात कोणतीही नवीन त्वचेची ट्रीटमेंट करु नका. फेस वॅक्सिंग, बॅक वॅक्सिंगसारखे प्रकार लग्नापूर्वी प्रथमच करु नयेत.
मुख्य दिवसाअगोदर चार दिवसापूर्वी फेशिअल करावे.
तुमच्या चेहºयाचा आकार आणि तुमचे व्यक्तिमत्त्व पाहूनच हेअर स्टाईल निवडा.
स्ट्रीकिंग, कलर चेंज, रिबाँडिंग, पर्मिंग हे एका महिन्यापूर्वी ट्राय करा.
केस मोकळे सोडणार असाल तर त्यासाठी योग्य हेअरकट करुन घेणे आवश्यक आहे.
तुमचे केस चमकदार आणि चांगले दिसावेत, तुमच्या केसांकडे लक्ष जावे यासाठी टेक्श्चर आणि क्वॉलिटीची गरज आहे.
सूर्यप्रकाशात फार फिरु नका. चांगल्या प्रकारचा सनस्क्रीन वापरा.
लग्नानंतर घ्यावयाची काळजी
तुमचे लग्न झाल्यानंतर त्वचा आणि केसांची काळजी घेणे बंद करणे योग्य नव्हे. लग्नानंतरही काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना अधिक चकाकी येण्यासाठी मेकअप आणि हेअरस्टाईल साधनांचा वापर करा. लग्नानंतर तीन आठवड्यांनी पुन्हा फेशिअल करा आणि हेअर स्पा घ्या. कोणत्याही काळजीविना तुम्ही हेअर कटचा वापर करु शकता. लग्नानंतरही तुम्ही अगदी आत्मविश्वासपूर्वक फिरु शकता.