त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी चंदनाच्या तेलाचा 'असा' करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:08 PM2019-09-20T12:08:29+5:302019-09-20T12:08:55+5:30

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, चंदनाचा वापर अनेक वर्षांपासून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर करण्यात येतो. चंदनाचा सुंगधही अत्यंत सुंदर असतो.

Sandalwood oil benefits in Marathi sandalwood benefits for skin and hair | त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी चंदनाच्या तेलाचा 'असा' करा वापर

त्वचा आणि केसांच्या समस्या सोडवण्यासाठी चंदनाच्या तेलाचा 'असा' करा वापर

Next

आयुर्वेदात सांगितल्यानुसार, चंदनाचा वापर अनेक वर्षांपासून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी करण्यात येत आहे. अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर करण्यात येतो. चंदनाचा सुंगधही अत्यंत सुंदर असतो. चंदनामधील गुणधर्म त्वचा आणि केसांचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. जे त्वचेचं रंग उजळवण्यासोबतच डाग दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. चंदन त्वचेचा रंग उजळूवण्यासोबतच फ्रेश लूक मिळण्यासाठीही मदत करतं. 

जशी चंदनाची पावडर त्वचेसाठी फायदेशीर ठरते तसचं चंदनाचं तेलही चेहरा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. जाणून घेऊया चंदनाचं तेल केस आणि त्वचेसाठी कसं फायदेशीर ठरतं त्याबाबत... 

चंदनाच्या तेलाचे त्वचा आणि केसांसाठी होणारे फायदे : 

1. चंदनाच्या तेलामध्ये अ‍ॅन्टी-इफ्लेमेंट्री गुणधर्म असतात. जे त्वचेचं इन्फेक्शनपासून बचाव करण्याचं काम करतात. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेची जळजळ दूर करतात. चंदनाचं तेल रात्री चेहऱ्यावर लावून झोपा आणि सकाळी चेहरा माइल्ड साबणाच्या किंवा फेसवॉशच्या मदतीने स्वच्छ करा. त्वचा सॉफ्ट आणि ग्लोइंग दिसू लागेल. 

2. चंदनाचं तेल नॅचरल पद्धतीने पेशींच्या पुनर्निमाणासाठी मदत करतं. जर तुम्ही साइन ऑफ एजिंग आणि सुरकुत्यांच्या समस्यांनी हैराण असाल तर त्यासाठी चंदनाचं तेल अत्यंत फायदेशी ठरतं. 

3. अ‍ॅन्टी-इंफ्लेमेंट्री गुणधर्मांमुळे पिंपल्स कमी होतात. चेहऱ्यावर येणारी सूज, पिंपल्स यांपासूनही सुटका होते. तसेच त्वचा स्वच्छ होते. चंदनाच्या तेलामध्ये थोडी मुलतानी मती एकत्र करा. तयार मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅकप्रमाणे लावून 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. पिंपल्सची समस्या कमी होण्यास मदत होईल. 

4. जेव्हा तुम्ही केसांसाठी शॅम्पू वापरता, त्यावेळी चंदनाचं तेल एक मग पाण्यामध्ये एकत्र करा. त्या पाण्याने केस धुवून टाका. यामुळे केस मुलायम होण्यास मदत होते. 

5. अनेकदा केस ड्राय होतात. त्यांना सॉफ्ट करण्यासाठी त्यामध्ये थोडसं जोजोबा ऑइल एकत्र करून केसांना व्यवस्थित लावा. सकाळी शॅम्पूच्या मदतीने केस धुवून टाका. केसांना पोषण मिळण्यासोबतच ड्रायनेस दूर होण्यासही मदत होईल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Sandalwood oil benefits in Marathi sandalwood benefits for skin and hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.