जुळे होण्याचे रहस्य अखेर उलगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2016 02:12 PM2016-05-03T14:12:54+5:302016-05-03T19:48:12+5:30

काही महिलांना जुळे होतात आणि इतरांना नाही याचे कारण आहे जेनेटिक व्हॅरिएंट.

The secret of twinkling finally came out | जुळे होण्याचे रहस्य अखेर उलगडले

जुळे होण्याचे रहस्य अखेर उलगडले

Next
ळे मुलं होणं नेहमीच कौतुकाची आणि उत्सुकतेची गोष्ट असते. जुळी मुलं होण्यामागे नेमके कारण कोणते याचा शोध संशोधक घेत आले आहेत.

आतापर्यंतच्या रिसर्चमधून असे दिसून आले की, ज्या महिलांचे नातेवाईकांमध्ये जर जुळे झालेले असतील तर त्या महिलालेदेखील जुळे होण्याची शक्यता अधिक असते.

परंतु यामगाचे स्पष्ट कारण अज्ञात होते. नेदरलँड्समधील संशोधकांनी अखेर या रहस्याचा उलगडा केल्याचा दावा केला आहे.

विर्जे विद्यापीठातील जैविक मानसशास्त्रज्ञ डॉरेट बूमज्मा यांनी माहिती दिली की, काही महिलांना जुळे होतात आणि इतरांना नाही याचे कारण आहे जेनेटिक व्हॅरिएंट. अशा प्रकारच्या दोन जनुकांचा शोध लावण्यात आम्हाला यश आले आहे.

या संशोधनामध्ये नेदरलँड, आॅस्ट्रेलिया आणि अमेरिके तील जुळे मुलं असणाऱ्या 1980 महिलांचा अभ्यास करण्यात आला. या मातांच्या जनुकांमध्ये काही समान धागा आहे का याचा शोध वैज्ञानिकांनी घेतला.

यातून काही जनुकांची निवड करण्यात आली आणि त्यांची तुलना आईसलँडमधील जुळ्या मुलांच्या 3597 मातांशी करण्यात आली.

Web Title: The secret of twinkling finally came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.