दुसऱ्यांचा टॉवेल वापरल्याने पिंपल्स होतात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:25 PM2019-01-03T16:25:06+5:302019-01-03T16:25:32+5:30
अनेक लोकांना ही सवय असते की, कुणाच्या घरी गेल्यावर हात-पाय धुतल्यावर त्यांच्याच टॉवेलने हात-पाय पुसतात.
(Image Credit : The Cheat Sheet)
अनेक लोकांना ही सवय असते की, कुणाच्या घरी गेल्यावर हात-पाय धुतल्यावर त्यांच्याच टॉवेलने हात-पाय पुसतात. तसेच काही लोक दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर त्या घरातील कुणाचातरी टॉवेल वापरतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, फार चुकीची सवय आहे. यामुळे तुम्ही इन्फेक्शनचे शिकार होऊ शकता आणि चेहऱ्यावर पिंपल्सही येऊ शकतात.
बालपणी तुम्हीही काही पुस्तकांमध्ये वाचलं असेल की, टॉवेल, टूथब्रश आणि अशाच काही पर्सनल वस्तू दुसऱ्या कुणासोबत शेअर करत नसतात. हे नियम पाळणं फारच गरजेचं आहे. पावसाळ्यात टॉवेल चांगल्याप्रकारे कोरडा होत नाही, त्यामुळे त्यात ओलावा असल्याने बॅक्टेरिया होतात. दिसायला तो टॉवेल तुम्हाला स्वच्छ वाटत असेल. पण त्यात भरपूर धुळ, मेकअप ऑईल आणि डेड स्कीन असतात. ज्यामुळे बॅक्टेरियाला वाढण्यास पुरक वातावरण मिळतं.
अमेरिकन जर्नल ऑफ इन्फेक्शन कंट्रोलमध्ये प्रकाशित एका शोधानुसार, वापरलेल्या टॉवेलमध्ये इ कोली (E Coli ) नावाचे बॅक्टेरिया फार जास्त प्रमाणात आढळतात. जेव्हा तुम्ही त्याच टॉवेलने चेहरा पुसाल तेव्हा बॅक्टेरिया तुमच्या चेहऱ्याला चिकटतात. हे बॅक्टेरिया रोमछिद्रांमध्ये जाऊन अडकतात आणि पुढे जाऊन यानेच पिंपल्स येतात.
काय कराल उपाय?
- तुमचा टॉवेल दर दोन दिवसांनी धुवा आणि उन्हात वाळत घाला. कधीही ओला टॉवेल बाथरुममध्ये पडून राहू देऊ नका. सर्वात जास्त बॅक्टेरिया ओल्या टॉवेलमध्येच असतात.
- जेव्हा टॉवेल घडी करुन कपाटात ठेवाल तेव्हा याची काळजी घ्या की, टॉवेल पूर्णपणे कोरडा असेल.
- शक्य असल्यास आणखी एक गोष्ट करु शकता, ती म्हणजे शरीर पुसण्यासाठी वेगळा टॉवेल आणि चेहऱ्यासाठी वेगळा टॉवेल वापरा. याने पिंपल्सचा धोका कमी होतो.
- कुणाच्या घरी गेलात तर तोंड पुसण्यासाठी टिश्यू पेपर किंवा रुमाल घेऊन जा. दुसऱ्यांच्या टॉवेलचा चुकूनही वापर करु नका.