मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:57 AM2019-08-16T10:57:15+5:302019-08-16T10:58:38+5:30

श्रावणाचा महिना म्हणजे, सणांचा महिना... अनेक सण या महिन्यात साजरे करण्यात येतात. या दिवसांमध्ये सणांचं वेगळं महत्त्व आहे. हातावरील मेहंदीचा रंग सौंदर्यात आणखी भर पाडण्याचं काम करतो.

Shravan Special How to remove fading mehendi or henna faster | मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स

मेहंदीचा रंग फिका पडलाय?; काढून टाकण्यासाठी 'या' आहेत घरगुती टिप्स

Next

(Image Credit : https://www.glossypolish.com)

श्रावणाचा महिना म्हणजे, सणांचा महिना... अनेक सण या महिन्यात साजरे करण्यात येतात. या दिवसांमध्ये सणांचं वेगळं महत्त्व आहे. हातावरील मेहंदीचा रंग सौंदर्यात आणखी भर पाडण्याचं काम करतो. परंतु, अनेकदा काही दिवसांनी हातावरील मेहंदीचा रंग निघून जातो. पण नक्षी लगेच जात नाही. अशातच ते दिसायलाही विचित्र दिसतं. अनेकदा रंग निघून गेल्यानंतरही नक्षी जाता जात नाही. पण आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला काही खास उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला हातावरील मेंहदी काढून टाकण्यास मदत होईल. 

ब्लीच 

जर तुम्हाला हातावरील मेहंदी काढून टाकायची असेल तर हातावर ब्लीच लावू शकता. मेहंदी काढून टाकण्यासाठी बाजारात कोणतंही खास ब्लीच मिळत नाही. तुम्ही चेहऱ्यावर लावण्यासाठी जे ब्लीच वापरणार असाल तेच ब्लीच तुम्ही हातावर लावू शकता. मेहंदी असलेल्या भागावर ब्लीच लावून ठेवा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. 

बेकिंग सोडा आणि लिंबू 

बेकिंग सोडा आणि लिंबाची घट्ट पेस्ट तयार करा आणि जिथे मेहंदी लावलेली आहे त्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. हा उपाय केल्यानंतर कदाचित तुमच्या हातांची त्वचा ड्राय होऊ शकते. त्यामुळे त्यावर मॉयश्चरायझर लावा. 

टूथपेस्ट 

टूथपेस्टमध्ये काही असे गुणधर्म असतात. ज्यामुळे मेहंदीचा रंग निघून जाण्यास मदत होते. टूथपेस्ट घेऊन जिथे मेहंदी लावण्यात आली आहे तिथे लावा. सुकल्यानंतर दोन्ही हातांवरील पेस्ट स्क्रब करत काढून टाका. 

हॅन्डवॉश

जर वर सांगणात आलेले सर्व ऑप्शन्स तुम्हाला करायचे नसतील तर अगदी सोपा उपायही आहे. तो म्हणजे घरात असणाऱ्या हॅन्डवॉशच्या मदतीने हात धुवा. साबणाच्या मदतीने मेहंदीचा रंग हलका होतो. परंतु यामुळेही अनेकदा हातांची त्वचा ड्राय होते. त्यामुळे मॉयश्चरयाझरचा वापर नक्की करा. 

ऑलिव्ह ऑइल 

ऑलिव्ह ऑइलमध्ये मीठ एकत्र करून मेहंदीवर लावा. 10 मिनिटांपर्यंत तसचं ठेवा. असं दोन ते तीन वेळा करा. असं केल्याने मेहंदी 1 ते 2 दिवसांमध्ये निघून जाईल. 

टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Web Title: Shravan Special How to remove fading mehendi or henna faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.