परफ्यूम आणि डिओच्या सततच्या वापराचे साइड इफेक्ट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 15:42 IST2018-07-24T15:42:32+5:302018-07-24T15:42:49+5:30
आज बाजारात वेगवेगळ्या कंपनींचे आणि क्वालिटीचे परफ्यूम मिळतात. पण दररोज परफ्यूम किंवा डिओ वापरण्याचे काही दुष्परिणामही आहेत. चला जाणून घेऊ याचे दुष्परिणाम....

परफ्यूम आणि डिओच्या सततच्या वापराचे साइड इफेक्ट्स
मुंबई : आजकाल प्रत्येक व्यक्ती शरीराला घामामुळे येणारी दुर्गंध घालवण्यासाठी परफ्यूम किंवा डिओड्रंटचा वापर करतात. आज बाजारात वेगवेगळ्या कंपनींचे आणि क्वालिटीचे परफ्यूम मिळतात. पण दररोज परफ्यूम किंवा डिओ वापरण्याचे काही दुष्परिणामही आहेत. चला जाणून घेऊ याचे दुष्परिणाम....
तज्ज्ञांनुसार, परफ्यूमच्या रोजच्या वापराने शरीराला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खासकरून यामुळे स्कीनसंबंधी समस्या आणि स्कीनवर रॅशेज येणे अशा समस्या होऊ शकतात.
काय आहेत दुष्परिणाम?
1) परफ्यूम आणि डिओमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूरो टॉक्सिन असतात, जे थेट सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर प्रभाव करतं. हे रोज वापरल्याने स्कीन अॅलर्जी, रॅशेज सारख्या गंभीर समस्या होऊ शकतात.
२) परफ्यूम शरीरातील हार्मोन्सवरही प्रभाव पाडतं. केमिकल्समुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
३) असंतुलित हार्मोन्समुळे महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
४) घाम जाणे हे आरोग्यासाठी फायद्याचं आहे. अशात काही परफ्यूम आणि डिओच्या वापरामुळे घाम येणे बंद होतं. शरीरातून बाहेर येणारे दुषित तत्व शरीरात जमा होतात.
५) रोज परफ्यूमचा वापर केल्याने अल्जायमरसारखा गंभीर आजारही होण्याची शक्यता अधिक असते.
६) परफ्यूमच्या रोजच्या वापरामुळे श्वासासंबंधी समस्याही निर्माण होऊ शकतात.