फक्त एका दिवसातचं कोपराचा काळपटपणा होईल दूर; ट्राय करा 'हा' पॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 12:24 PM2019-08-26T12:24:57+5:302019-08-26T12:28:23+5:30
अनेकदा लोक चेहरा आणि शरीराच्या अवयवांच्या त्वचेची फार काळजी घेताना दिसतात. परंतु, अनेकदा हाताच्या कोपराकडे दुर्लक्षं केलं जातं. त्यामुळे कोपराजवळची त्वचा काळी पडते. अनेकदा यामुळे तुमच्या ओवरऑल लूकवरही प्रभाव पडतो.
अनेकदा लोक चेहरा आणि शरीराच्या अवयवांच्या त्वचेची फार काळजी घेताना दिसतात. परंतु, अनेकदा हाताच्या कोपराकडे दुर्लक्षं केलं जातं. त्यामुळे कोपराजवळची त्वचा काळी पडते. अनेकदा यामुळे तुमच्या ओवरऑल लूकवरही प्रभाव पडतो. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. पण एवढं करूनही काहीच फायदा होत नाही. जर तुम्हीही अशा समस्येचा सामना करत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अगदी सोपा प्लॅन सांगणार आहोत. जो फक्त एका दिवसातच कोपराचा काळपटपणा दूर करण्यासाठी मदत करेल.
पॅक तयार करण्यासाठी लागणारं साहित्य...
- मध
- खोबऱ्याचं तेल
- लिंबाचा रस
- बेकिंग सोडा
असा तयार करा पॅक...
- सर्वात आधी एका बाउलमध्ये मध काढून घ्या आणि त्यामध्ये खोबऱ्याचं तेल एकत्र करा. दोन्ही एकत्र मिक्स करून एक स्मूद पॅक तयार करा.
- तयार मिश्रणामध्ये लिंबाचा रस एकत्र करा आणि त्यानंतर मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या.
- सर्वात शेवटी बेकिंग सोडा एकत्र करा आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. लक्षात ठेवा की, मिश्रण व्यवस्थित एकत्र करणं आवश्यक आहे.
लावण्याची पद्धत...
- सर्वात आधी आपला कोपर साबणाने धुवून घ्या. त्यानंतर थोडसं स्क्रब करा.
- तयार पॅक बोटांच्या मदतीने कोपरावर लावा.
- पॅक सुकल्यानंतर सॉफ्ट कपडा त्यावर बांधा. त्यामुळे पॅक तसाच राहिल. पडणार नाही.
- सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याच्या मदतीने स्क्रब करत पॅक काढून टाका.
हा पॅक फक्त एक दिवस लावल्यानेच तुम्हाला फरक जाणवेल. पॅक काढून टाकल्यानंतर कोपरावर चांगलं मॉयश्चरायझव अप्लाय करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.