तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकता तुमचा स्वभाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 03:46 PM2018-07-28T15:46:29+5:302018-07-28T15:46:39+5:30

तुम्ही कधी तुमच्या बसण्याच्या पद्धतीचा विचार केलाय का? नसेल केला तर अवश्य करा. कारण आपण कसे बसतो, यावरूनही आपला स्वभाव समजून घेता येतो. प्रत्येकाचीच बसण्याची पद्धत वेगळी असते.

sitting positions reveal about personality | तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकता तुमचा स्वभाव!

तुमच्या बसण्याच्या पद्धतीवरून जाणून घेऊ शकता तुमचा स्वभाव!

googlenewsNext

तुम्ही कधी तुमच्या बसण्याच्या पद्धतीचा विचार केलाय का? नसेल केला तर अवश्य करा. कारण आपण कसे बसतो, यावरूनही आपला स्वभाव समजून घेता येतो. प्रत्येकाचीच बसण्याची पद्धत वेगळी असते. पण यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, आपल्या बसण्याच्या पद्धतीवरून आपल्या व्यक्तिमत्वाबाबत अनेक गोष्टी उघड होतात. बॉडी लॅग्वेजवर झालेल्या संशोधनातून मानसोपचारतज्ज्ञांचं एक मत समोर आलं आहे. ज्यामध्ये, आपल्या बसण्याच्या पद्धतीवरून आपलं व्यक्तिमत्व व्यक्त होतं. या गोष्टीला सर्वांनी दुजोरा दिला आहे. जाणून घेऊयात बसण्याच्या पद्धतींबाबत ज्यावरून व्यक्तिच्या व्यक्तिमत्वाबाबत आणि स्वभावाबाबत समजतं...

पायावर पाय टाकून बसण्याची पद्धत

पायावर पाय टाकून बसणं म्हणजे तो व्यक्ति ओपन माइंन्डेड आणि जीवनाबाबत निष्काळजीपणा यांसारखे स्वभावगुण दर्शवतो. असं मानलं जातं की, या लोकांची विचार करण्याची पद्धत ही सकारात्मक असते. त्याचबरोबर हे लोकं क्रिएटिव्ह आणि भावूक असतात.

सरळ बसणाऱ्या व्यक्ती

सरळ बसणाऱ्या व्यक्तिंमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. पाठ आणि पाय सरळ ठेवून बसणारे लोकं वेळेचे पक्के असतात. त्याचबरोबर या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. ते तुमच्या विश्वासावर नेहमी खरे उतरतात. परंतु, या व्यक्ती आपल्या भावना कोणासमोर व्यक्त करत नाहीत. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या व्यक्ति छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करताना दिसून येतात.

पाठीवर वजन टाकून बसण्याची पद्धत

हात मागे करत पाठीवर वजन टाकून बसणारी व्यक्ति ही विश्लेषणात्मक विचार करणारी असते. या व्यक्ति कोणतेही काम करण्याआधी त्याच्या परिणामांचा बारकाईने विचार  करतात. तसेच या व्यक्ती कोणतेही काम करण्याआधी त्या कामाचा पूर्ण अभ्यास करतात. 

पाय पसरून बसणं

जर तुम्ही पाय पसरून बसत असाल तर तुम्ही तुम्हाला तुमच्या आयुष्याबाबत फारशी काळजी नाही. असे दिसते. अशी लोकं स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्यांना जबाबदार ठरवतात. त्याना नेहमी दुसऱ्यांवर आरोप करायला आवडतं. तसेच अशी लोकं अनेकदा दुसऱ्यांवर आपली मतं थोपवतात.

हाताची घडी घालून बसणं

हाताची घडी घालून बसणं तुमची ताकद आणि तुमचा आत्मविश्वास दर्शवतो. ही लोकं अत्यंत विचारशील आणि गंभीर स्वभावाचे असतात. असं बसून तुम्ही अनेकदा स्वतःला असा विश्वास देता की, तुम्ही सुरक्षित आहात.

हात जोडून बसणं

या व्यक्ती शांत स्वभावाच्या आणि एकाग्री असतात. असं बसणाऱ्या व्यक्ति अत्यंत विनम्र, थोड्याशा लाजाळू आणि संवेदनशील असतात. 
 

Web Title: sitting positions reveal about personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.