डार्क स्किन टोन लाइट करण्यासाठी महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सऐवजी करा 'हे' घरगुती उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 11:56 AM2019-10-01T11:56:35+5:302019-10-01T12:01:35+5:30
हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसोबतच प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, तिचा स्किन टोनही लाइट रहावा त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसेल. परंतु, असं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा योग्य स्किन केअर रूटिन फॉलो करण्यात येईल.
हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसोबतच प्रत्येक मुलीची अशी इच्छा असते की, तिचा स्किन टोनही लाइट रहावा त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुलून दिसेल. परंतु, असं तेव्हाच शक्य आहे, जेव्हा योग्य स्किन केअर रूटिन फॉलो करण्यात येईल. चेहऱ्यावर मेकअप लावल्याने काहीवेळासाठी डाग लपवणं शक्य होतं. परंतु, क्लिंजिंग केल्यानंतर पुन्हा डाग दिसू लागतात.
स्किन टोन लाइट करण्यासाठी मार्केटमध्ये हजारो प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. परंतु, या प्रोडक्ट्समुळे अनेकदा स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. पण जर स्किनचा लाइट टोन नैसर्गिक पद्धतींनी मिळवता आला तर मग त्याची बात औरच... आज आम्ही तुम्हाला असेत काही उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही डार्क स्किन टोन लाइट करू शकता...
1. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक असतं की, दररोज भरपूर पाणी प्या. शरीरामध्ये पाणी योग्य प्रमाणात असेल तर त्वचेवर नॅचरल ग्लो येतो. त्याचबरोबर स्किनही हेल्दी राहते. पाणी प्यायल्याने शरीरामध्ये विषारी तत्व बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीर स्वच्छ राहतं आणि त्वचाही हेल्दी राहते.
2. त्वचेची निगा राखण्यासाठी नियमितपणे एक प्रॉपर चार्ट फॉलो करा. म्हणजेच, दररोज त्वचेची व्यवस्थित स्वच्छता करा. झोपण्यापूर्वी मेकअप रिमूव्ह करायला विसरू नका. फेसवॉशच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा आणि घराबाहेर निगताना चेहरा कव्हर करायला विसरू नका.
3. नियमितपणे वर्कआउट केल्याने आणि पुरेशी झोप घेतल्याने त्वचेवर सकारात्मक प्रभाव पडतो. एक्सरसाइज केल्याने स्किनचे डिप पोर्स ओपन होतात आणि आतमधील घाण बाहेर निघून जाते. त्यामुळे स्किन हेल्दी राहते आणि ग्लो येण्यासही मदत होते.
4. स्किन टोन लाइट करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. दररोज चेहऱ्यावर लिंबाचा रस किंवा त्याची साल लावल्याने हळूहळू त्वचेचा काळपटपणा दूर होतो आणि रंग उजळण्यास मदत होते.
5. बटाट्याची साल काढून तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटांसाठी मालिश करा. असं केल्याने हळूहळू स्किन टोन लाइट होतो.
6. काकडीच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मालिश केल्याने चेहऱ्याचा काळपटपणा दूर होतो आणि चेहऱ्याची त्वचा उजळते. काकडीमध्ये अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. जे स्किन टोन लाइट करण्यासाठी मदत करतात. याव्यतिरिक्त हे सन टॅन दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. काकडी त्वचेसाठी नॅचरल टोनर मानलं जातं.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)