तिळाच्या तेलाने तळहातांची मालिश केल्याने दूर होतात 'या' समस्या, जाणून घ्या योग्य पद्धत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:04 PM2024-10-24T13:04:43+5:302024-10-24T13:05:25+5:30
Sesame Oil Massage on Hand : हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. फक्त फायद्यांसाठी हे तेल कसं वापरावं? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.
Sesame Oil Massage on Hand : तिळाच्या तेलाचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. या तेलांमध्ये अनेक औषधी गुण असल्याने अनेक समस्या समस्या दूर करण्यासाठीही याचा वापर केला जातो. त्वचेसाठी तर हे तेल खूप फायदेशीर मानलं गेलं आहे. हिवाळ्यात होणाऱ्या त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा तुम्ही वापर करू शकता. फक्त फायद्यांसाठी हे तेल कसं वापरावं? हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तेच आज आम्ही सांगणार आहोत.
तिळाच्या तेलाने तर रोज तळहातांची मालिश केली तर त्वचेला आणि आरोग्याला अनेक फायदे मिळतात. चला जाणून घेऊ या तेलाने हाताची मालिश केल्यावर काय फायदे मिळतात.
सूज कमी होते
हातांवर येणारी सूज कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाने मालिश करावी. यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे सूज कमी करण्यासाठी प्रभावी असतात. सोबतच याने मांसपेशींमधील तणावही कमी होऊ शकतो.
चट्टे कमी होतात
हातांवर होणारी खाज, चट्टे आणि त्वचा निघण्याची समस्या कमी करण्यासाटी हातांवर तिळाच्या तेलाने मालिश करू शकता. यात व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. जे चट्टे कमी करतात. सोबतच त्वचेवरील डागही याने दूर होतात.
मांसपेशी राहतात अॅक्टिव
हातांसोबतच शरीरातील इतर भागातील मांसपेशी अॅक्टिव ठेवण्यासाठी तुम्ही तिळाच्या तेलाने मालिश करू शकता. तिळाच्या तेलामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, आयर्न, झिंक आणि सेलेनियमसारखे पोषक तत्व असतात. जे तुमच्या मांसपेशी अॅक्टिव ठेवतात.
त्वचा हायड्रेट राहते
त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठीही सुद्धा तिळाच्या तेलाचा वापर करू शकता. सामान्यपणे हिवाळ्यात हातांची त्वचा निघते. ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. या स्थितीत तुम्ही तिळाच्या तेलाने हातांची मालिश करू शता. यात व्हिटॅमिन ई आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे त्वचा हायड्रेट ठेवतात. सोबतच सूर्याच्या यूव्ही किरणांपासूनही त्वचेची सुरक्षा करतात.
ब्लड सर्कुलेशन सुधारतं
हातांची तिळाच्या तेलाने मालिश केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होण्यास मदत मिळते. याने शरीरात सगळीकडे रक्त पुरवठा व्यवस्थित होतो. सोबतच याने मेंदुला शांतताही मिळते. ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.
कशी कराल मालिश?
हातांवर तिळाच्या तेलाने मालिश करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये तेल घ्या, त्यात 1 ते 2 लवंग टाकून तेल हलकं गरम करा. नंतर हे तेल हातांवर लावून काही वेळ प्रेशर देऊन मालिश करा.