ऑयली स्किनसाठी चंदनाचे 'हे' 2 फेस पॅक ठरतील फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 12:35 PM2018-10-05T12:35:54+5:302018-10-05T12:38:30+5:30

ऑयली स्किन असणारी लोकं नेहमी आपल्या स्किन प्रॉब्लेम्समुळे चिंतेत असतात. ऑक्टोबर हिटमुळे या लोकांना आणखी त्रास होतो. पण त्याचा अर्थ असा नाही की इतरवेळी यांना स्किन प्रॉब्लेम्स सतावत नाहीत.

skin care for oily skin sandalwood face pack for oily skin to get bright and flawless skin | ऑयली स्किनसाठी चंदनाचे 'हे' 2 फेस पॅक ठरतील फायदेशीर!

ऑयली स्किनसाठी चंदनाचे 'हे' 2 फेस पॅक ठरतील फायदेशीर!

Next

ऑयली स्किन असणारी लोकं नेहमी आपल्या स्किन प्रॉब्लेम्समुळे चिंतेत असतात. ऑक्टोबर हिटमुळे या लोकांना आणखी त्रास होतो. पण त्याचा अर्थ असा नाही की इतरवेळी यांना स्किन प्रॉब्लेम्स सतावत नाहीत. थंडीमध्येही स्किनवरचं आईल यांचा पाठलाग सोडतचं नाही. बदलणाऱ्या वातावरणामुळे ऑयली स्किनचा त्रास आणखी वाढतो. त्यामुळे याची काळजी घेणंही फार त्रासदायक ठरू शकतं. 

तुम्हीही याच समस्यांचा सामना करत असाल तर, आम्ही आज तुम्हाला तुमच्या ऑयली स्किनला ठिक करण्यासाठी 2 फेस पॅक सांगणार आहोत. या दोन्ही फेस पॅकमध्ये चंदनाचा वापर करण्यात आलेला आहे. चंदनाच्या तेलामध्ये किंवा पावडरमध्ये अॅन्टी-बॅक्टेरिअल आणि अॅन्टी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे स्किनवरील एक्स्ट्रा आईल काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

चेहऱ्यावर जास्त ऑइल जमा झाल्यामुळे पिंपल्स, खाज, स्किन इन्फेक्शन इत्यादी स्किन प्रॉब्लेम्सची समस्या होते. या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही चंदनाच्या फेस पॅकचा वापर करू शकता. जाणून घेऊयात फेस पॅक तयार करण्याची सोपी पद्धत...

पहिला फेस पॅक - चंदन, टोमॅटो आणि मुलतानी माती

जर चेहऱ्यावर एक्स्ट्रा ऑईल आणि घाण स्वच्छ करण्यासाठी अनेक उपाय करत असाल तर हा फेस पॅक तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. त्याचबरोबर स्किनचा रंग उजळण्यासाठीही हा फेस पॅक फायदेशीर ठरतो.  

- 1/2 चमचा चंदन पावडर 

- 1/2 चमचा टोमॅटोचा रस 

- 1/2 चमचा मुलतानी माती

- गुलाब पाणी

फेस पॅक तयार करण्याची कृती -

एका बाउलमध्ये चंदन पावडर आणि टोमॅटोचा रस एकत्र करा. पातळ पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये मुलतानी माती मिक्स करा. थोडंसं गुलाब पाणी एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर ती चेहरा आणि मानेवर लावा. फेस पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. 

दुसरा फेस पॅक - चंदन आणि संत्री

आठवड्यातून दोन वेळा या फेस पॅकचा वापर केल्याने ऑयली स्किनपासून सुटका होईल. त्याचबरोबर चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑईल आणि घाण काढून टाकण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर संत्र्यातील अॅन्टी-ऑक्सिडंट गुणधर्म स्किन इन्फेक्शनपासून सुटका करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

- 1 चमचा संत्र्याच्या सालींची पावडर

- 1 चमचा चंदनाची पावडर

- 1 ते 2 चमचे गुलाब पाणी

फेस पॅक तयार करण्याची कृती -

एका बाउलमध्ये संत्र्याच्या सुकलेल्या सालींची पावडर आणि चंदनाची पावडर एकत्र करा. त्यामध्ये थोडं गुलाब पाणी टाका. तयार झालेला फेस पॅक चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका. 

Web Title: skin care for oily skin sandalwood face pack for oily skin to get bright and flawless skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.