हातांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी करा 'हे' 3 उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 05:46 PM2019-02-16T17:46:34+5:302019-02-16T17:47:26+5:30
हिवाळा संपत आला असला तरी वातावरणातील गारवा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी वाढतचं जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीराच्या इतर अवयवांपेक्षा थंडीचा परिणाम हातांवर चटकन दिसून येतो.
हिवाळा संपत आला असला तरी वातावरणातील गारवा मात्र कमी होण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्याऐवजी वाढतचं जात आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? शरीराच्या इतर अवयवांपेक्षा थंडीचा परिणाम हातांवर चटकन दिसून येतो. कारण आपण अनेक कामांसाठी हातांचा वापर करतो. तसेच अनेकदा काम करताना हात धुण्याचीही गरज भासते. त्यामुळे हातांच्या त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो. असातच हातांची जास्त काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं.
पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या हातांची स्किन वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित होत असते. घरातील कामांसोबतच बाहेरील कामांमुळेही हातांची स्किन खराब होते. बाजारामध्ये खासकरून हातांसाठी मिळणारी हॅन्ड क्रिमही त्यांना ठिक करू शकत नाही. त्यामुळे येथे आम्ही हातांची स्किन सॉफ्ट करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला बेबी सॉफ्ट हॅड्स मिळण्यासाठी मदत होइल.
बेबी सॉफ्ट हॅन्ड्ससाठी काही उपाय :
1. आपल्या एका हातामध्ये अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइल घेऊन त्यामध्ये एक चमचा साखर एकत्र करा. आता हळूहळू दोन्ही हात एकमेकांवर रब करून मसाज करा. 2 ते 3 मिनिटांनी मसाज करा आणि त्यानंतर कोमट पाण्याने हात धुवून टाका. हातांची त्वचा सॉफ्ट करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
2. एका बाउलमध्ये एक चमचा ग्लिसरीन, थोडं गुलाबपाणी आणि थोडं लिंबाचा रस एकत्र करा. आता या मिश्रणाने संपूर्ण हातांना मसाज करा. कमीत कमी 10 मिनिटांसाठी मसाज करा.
मसाज करत असताना हे मिश्रण स्किनमध्ये शोषून घेतलं जाईल. ज्यामुळे तुम्हाला हात धुण्याची गरज भासणार नाही. परंतु तुम्हाला हात धुवायचे असतीलच तर थोड्या वेळानंतर धुतल्यास फायदा होइल. हात धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.
3. एका कटोरीमध्ये एक चमचा खोबऱ्याचं तेल, दोन चमचे मध, थोडा लिंबाचा रस, साखर एकत्र करा. तयार मिश्रणाच्या सहाय्याने हातांवर मसाज करा. थोड्या वेळाने हात धुवून टाका.
टिप : हात मुलायम करण्यासाठी सांगण्यात आलेले वरील सर्व उपाय घरगुती असून स्किनवर नॅचरल स्क्रबप्रमाणे काम करतात. हे सर्व स्क्रब नचरल पदार्थांपासून तयार करण्यात आलेले असतात. परंतु, कधी कधी एखाद्या पदार्थाची एखाद्या व्यक्तीला अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अनेकदा तर या पदार्थांचा जास्त वापर केल्यामुळे समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.